श्रद्धा बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:34+5:302021-09-22T04:17:34+5:30

२१ सप्टेंबर १९९५ रोजी गणपतीने दूध प्राशन केल्याची अफवा पसरली होती. देशातील नव्हे तर परदेशात गणपतीने दूध प्राशन ...

Faith should be tested by intellect | श्रद्धा बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्याव्यात

श्रद्धा बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्याव्यात

Next

२१ सप्टेंबर १९९५ रोजी गणपतीने दूध प्राशन केल्याची अफवा पसरली होती. देशातील नव्हे तर परदेशात गणपतीने दूध प्राशन केल्याचा दावा भक्तांनी केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेची चिकित्सा करून सत्यशोधन केले होते. तेव्हापासून हा दिवस जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने हा कार्यक्रम फेसबुकवरून प्रसारित झाल्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांचे प्रबोधन झाले. कार्यक्रमाची सुरुवात तथाकथित चमत्कार करत पाण्याने दिवा पेटवून झाली. त्यामागचे विज्ञान चांदगुडे यांनी स्पष्ट करून सांगितले. यावेळी माणसे अंधश्रद्धेच्या आहारी का जातात, बुवाबाबाकडे लोकांची गर्दी का होते, अंनिसपुढचे आव्हान काय आहे, जात पंचायतचे काम कसे चालते, कौमार्य परीक्षा कशी घेतली जाते, आदी प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. जिजाऊ वंदन गायन सई वाकचौरेने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय जिल्हाध्यक्ष अनुराधा धोंडगे यांनी केला. या चर्चासत्रामध्ये वैशाली डुंबरे, अनुराधा धोंडगे, रोहिणी बाविस्कर-मोरे. कल्याणी वाघ, सुरेखा कोल्हे, संगीता पाटील या जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. बडदे नगर शाखाप्रमुख शिवमती रोहिणी मोरे यांनी आभार मानले (फोटो २१ नाशिक)

Web Title: Faith should be tested by intellect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.