नाशिक जिल्ह्यात बनावट ताडी विक्रीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 07:59 PM2018-01-03T19:59:24+5:302018-01-03T20:00:59+5:30
नाशिक : डिसेंबर महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री विरोधात उघडलेल्या मोहिमेत जिल्ह्यात अद्यापही घातक रसायनांचा वापर करून बेकायदेशीरपणे ताडी विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आली असून, ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यातून ४६० लिटर ताडी जप्त करण्यात आल्याने बनावट ताडी विक्रेत्यांची टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साधारणत: दहा वर्षापुर्वी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट ताडी विक्री केली जात असल्याची दखल राज्याच्या विधीमंडळाला घ्यावी लागली होती व त्याच्या आधारे संपुर्ण राज्यातच ताडी विक्रीवर बंदी घालण्याची कार्यवाही राज्य सरकारला करावी लागली होती. फुफ्फूसांना छिद्रे पाडणे व हाडे ढिसूळ करणारे क्लोरोहाईड्रेड नावाच्या रसायनाचा मुख्यत्वे वापर करून तयार करण्यात येणाºया ताडीमुळे जिल्ह्यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे बनावट ताडीची विक्री शासनाकडून अधिकृत परवाना घेतलेल्या ताडी विक्रेत्यांकडून केला जात असल्याचे त्यावेळी उघडकीस आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सेतुरामन चोक्कलिंगम यांनी या प्रकरणी शासनाकडे अहवाल पाठवून ताडी विक्री बंदीची शिफारस केली होती. त्यानंतर जवळपास पाच ते सात वर्षे ताडी विक्रीवर शासनाने बंदी घातली. आता शासनाने ताडी विक्रीबाबत नवीन धोरण तयार करून झाडांच्या संख्येवर ताडी दुकानांचा लिलाव सुरू केला,जेणे करून झाडापासून निर्मित ताडीचीच विक्री केली जाईल परंतु या धंद्यातील माफियांनी त्यावरही तोडगा शोधून बनावट ताडी तयार करणे व तिची विक्री करून मानवी जिवीताशी खेळण्याचा धंदा सुरूच ठेवला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्यात राबविलेल्या मोहिमेत बनावट ताडी आढळून आल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. साधारणत: मालेगाव, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेवर व नाशिक शहरातही काही ठिकाणी बनावट ताडी विक्री केली जात असल्याने अशा अड्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांनीही बनावट ताडीच्या विक्रीला दुजोरा दिला असून, त्याविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सुचना संबंधित निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. ज्या हद्दीत बनावट ताडीची विक्री केल्याचे आढळल्यास त्या भागातील निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला जात असल्यामुळे अधिकाºयांवर दडपण वाढले आहे. मात्र बनावट ताडी तयार करणाºयांचा अद्याप शोध लागू शकलेला ना