राज्यातील बनावट ई-पास विक्र ीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:22 AM2020-08-28T01:22:36+5:302020-08-28T01:22:55+5:30
‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाऱ्यां-कडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर एका व्हायरल ध्वनीफितीच्या आधारे नाशिक क्र ाइम ब्रँच युनिट १ च्या पथकाने बनावट ई-पास विक्र ीचा पर्दाफाश करत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील रहिवासी असलेला संशयित राकेश सदानंद सुर्वे ऊर्फ कृष्णा (३२) यास गुरुवारी (दि.२७) बेड्या ठोकल्या.
नाशिक : ‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाऱ्यां-कडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर एका व्हायरल ध्वनीफितीच्या आधारे नाशिक क्र ाइम ब्रँच युनिट १ च्या पथकाने बनावट ई-पास विक्र ीचा पर्दाफाश करत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील रहिवासी असलेला संशयित राकेश सदानंद सुर्वे ऊर्फ कृष्णा (३२) यास गुरुवारी (दि.२७) बेड्या ठोकल्या.
कोरोना संक्रमणामुळे आंतरजिल्हा तसेच राज्यात प्रवास करण्यावर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त करून घेतल्यानंतरच प्रवासाला विविध अटी व शर्तीनुसार परवानगी दिली जाऊ लागली. याचा फायदा काही भामट्यांनी घेत बनावट ई-पास बनविण्याची युक्ती शोधून काढत हजारो ते लाखो रुपये कमाविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ई-पासबाबतची ध्वनीफीत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हायरल झाली आणि पोलिसांसाठी हाच धागा महत्त्वाचा ठरला. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी याप्रकरणी येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा नोंदविला.
तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने नाशिकच्या क्राइम ब्रँच युनिट-१च्या पथकाने ध्वनीफीतमधील आवाजाचा मागोवा घेण्यास सुरु वात केली. त्यावरून तपासाचे धागेदोरे थेट रत्नागिरीच्या गुहागरपासून मुंबईच्या डोंबिवलीपर्यंत जाऊन पोहोचले. संशयित गुहागरला असल्याचे निष्पन्न होताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक बलराम पालकर, दिलीप मोंढे, विशाल देवरे यांचे पथक रवाना केले. व्हॉट्सअॅपवर व्हायरल ध्वनीफीतमधील आवाज असलेला मोबाइलधारक गुहागर येथील संशयित सुर्वे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत १५ प्रवाशांकडून लॉकडाऊन काळात मुंबई येथून रत्नागिरीला जाण्यासाठी प्रत्येकी २ हजार रु पये घेत पोलिसांच्या नावाने बनावट ई-पास इतर ठिकाणांवरुन काढून दिल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता ई-पास काढण्यासाठी वापर करत असलेला टॅब, मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पालकर करीत आहेत. विशेष बाब म्हणजे हा सुर्वेदेखील मनसेचा गुहागर तालुका सचिव असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
ध्वनीफीतमध्ये पोलिसांच्या नावाने आश्वासन
व्हायरल ध्वनीफितीची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. यामध्ये सुर्वे नावाची व्यक्ती प्रत्येकी दोन हजार रु पये स्वीकारून नाशिक पोलिसांच्या नावाने ई-पास देण्याचे आश्वासन देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवून तपासचक्र े फिरविली.
वाढदिवसालाच हाती पडल्या बेड्या
एकीकडे सोशल मीडियावर सुर्वे याला वाढदिवसाच्या शुभेच्छाच्ाां वर्षाव सुरू असताना दुसरीकडे गुरु वारी त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या. सुर्वे याचा गुरु वारी २७ आॅगस्ट रोजी वाढदिवस होता आणि याच दिवशी त्याला पोलिसांचे रिमांड भोगण्याची वेळ आली.