बनावट नोटा व्यवहारात आणणा-या तरूणाला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 01:44 PM2020-03-17T13:44:19+5:302020-03-17T13:45:08+5:30
पिंपळगाव बसवंत : शंभर रूपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणा-या पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे.
पिंपळगाव बसवंत : शंभर रूपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाºया पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना आरोपीस पकडण्यात यश मिळाले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १ जानेवारी २०२० रोजी रात्री नऊच्या सुमारास युनियन बँक इंडियाचे बचत खाते असलेला पियुष विजय तोडकर याने पिंपळगाव शाखेच्या डिपॉझटि मशीनमध्ये नवीन शंभर रु पयांच्या चलनाच्या बनावट तीस नोटा आपल्या बचत खात्यात जमा केल्या असता त्या नोटा बनावट असल्याने फेक डिपॉझटिमध्ये जमा झाल्या. पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध घेतला असता पिंपळगाव येथील पियुष विजय तोडकर यास अटक केली. चलनी नोटा स्वत: तयार करून स्वत: बाळगून व त्या व्यवहारात आणल्या म्हणून युनियन बँक इंडिया पिंपळगाव बसवंतचे उपशाखा अधिकारी क्षितिज घनश्याम विसावा यांच्या फिर्यादीने आरोपीविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहे.