बनावट नोटा व्यवहारात आणणाऱ्यास बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:55 PM2020-03-17T22:55:49+5:302020-03-17T22:56:17+5:30
पिंपळगाव बसवंत : शंभर रुपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाºया पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना आरोपीस पकडण्यात यश मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १ जानेवारी २०२० रोजी रात्री ९ च्या सुमारास युनियन बँक इंडियाचे बचत खाते असलेला पीयूष विजय तोडकर याने पिंपळगाव शाखेच्या डिपॉझिट मशीनमध्ये नवीन शंभर रुपयांच्या चलनाच्या बनावट तीस नोटा आपल्या बचत खात्यात जमा केल्या असता त्या नोटा बनावट असल्याने फेक डिपॉझिटमध्ये जमा झाल्या.
पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध घेतला असता पिंपळगाव येथील पीयूष विजय तोडकर यास अटक केली.चलनी नोटा स्वत: तयार करून स्वत: बाळगून त्या व्यवहारात आणल्या म्हणून पिंपळगाव बसवंत येथील युनियन बँक इंडियाचे उपशाखा अधिकारी क्षितिज घनश्याम विसावा यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव बसवंतचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.