फळांची आवक घटली, रुग्णांचे हाल

By admin | Published: June 3, 2017 12:32 AM2017-06-03T00:32:10+5:302017-06-03T00:36:08+5:30

नाशिक : विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा नाशिकच्या बाजारपेठेवरही विपरीत परिणाम बघायला मिळाला

Fall in the fruit, the patient's condition | फळांची आवक घटली, रुग्णांचे हाल

फळांची आवक घटली, रुग्णांचे हाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा नाशिकच्या बाजारपेठेवरही विपरीत परिणाम बघायला मिळाला. शहरातील फळबाजारात फळांची पुरेशी आवक झालेली नसल्याने उपलब्ध फळांची चढ्या दराने विक्री होत असल्याचे चित्र भद्रकाली फळबाजारात शुक्रवारी बघायला मिळाले.
रमजान महिना तसेच दाट लग्नतिथी असल्याने पालेभाज्या उपलब्ध होत नसतानाच उपवासासाठी आणि समारंभात कोशिंबिरीसाठी किंवा सजावटीसाठी फळांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र शहरातील बाजारपेठेत फळांची उपलब्धता नाही तसेच अनेक फळविक्रेत्यांनी मुंबईहून शहरात फळे दाखल6 न झाल्याने आपली दुकाने बंद ठेवणेच पसंद केले. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईच्या बाजारपेठेतून नाशिकमध्ये विविध फळे दाखल होतात, परंतु शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आणि मालवाहतूक सेवा बंद असल्याने नाशिकमध्ये गुरुवारी फळांची आवक झाली नाही, शनिवारी (दि. ३) नव्याने बाजारपेठेत फळ दाखल झाली नाहीत तर नाशिकच्या फळबाजारात शुकशुकाट बघायला मिळेल असे फळ व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. उपवासाबरोबरच दाट लग्नतिथीमुळे फळांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असली तरी प्रत्येक ग्राहकाला फळे मिळावीत आणि फळे नाशवंत असल्याने उपलब्ध फळांचे नुकसान होऊ नये यासाठी विक्रेत्यांनी फळांच्या विक्रीस प्राधान्य दिले आहे.

Web Title: Fall in the fruit, the patient's condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.