सोयाबीनच्या दरात घसरण, केंद्राने सोयाबीन केले आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2024 14:48 IST2024-02-04T14:24:32+5:302024-02-04T14:48:23+5:30
केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने या सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याचे देखील यावेळी शेतकऱ्याचं सांगणं आहे.

सोयाबीनच्या दरात घसरण, केंद्राने सोयाबीन केले आयात
केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात एक हजार रुपयाची घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालखेड उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या भावात हजार रुपयाची घसरण झाल्याचं दिसून येत असून केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणाला शेतकरी हैराण झाला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्याने या सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याचे देखील यावेळी शेतकऱ्याचं सांगणं आहे.
सध्या सोयाबीनला 4 हजार ते 4200 रुपये भाव मिळत असल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने सोयाबीनला सात ते साडेसात हजार रुपये भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघेल अशी अपेक्षा आता सोयाबीन उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे. तरी सरकारने सोयाबीन आयात करू नये अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे.