कांदा भावात घसरण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:30 AM2017-08-12T00:30:23+5:302017-08-12T00:30:31+5:30

उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण सुरुच असून, शुक्रवारी पुन्हा कांद्याचे भाव पडले. नामपूर बाजार समिती आवारात कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची घसरण झाली. सरासरी दोन हजार रुपय े क्विंटल भाव मिळाला. सटाण्यात मात्र आवक वाढली असली तरी भाव स्थिर राहिले.

Falling onion continues to decline | कांदा भावात घसरण सुरूच

कांदा भावात घसरण सुरूच

Next

सटाणा : उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण सुरुच असून, शुक्रवारी पुन्हा कांद्याचे भाव पडले. नामपूर बाजार समिती आवारात कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची घसरण झाली. सरासरी दोन हजार रुपय े क्विंटल भाव मिळाला. सटाण्यात मात्र आवक वाढली असली तरी भाव स्थिर राहिले. पुढील आठवड्यात बाजार समित्यांना तीन ते चार दिवस सुट्या असल्यामुळे या आठवड्यात कांद्याच्या आवकेत अचानक वाढ झाली आहे. चाळीत भरलेला कांदा खराब होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी कांदा विक्र ीस आणणे पसंत करत आहे. त्यामुळे या आठवड्यात कांदा आवकेला तेजी आली आहे. शुक्रवारी नामपूर बाजार आवारात ७५४ वाहनांतून कांदा विक्रीस आला होता.  या वाहनांतून तब्बल पंचवीस हजार क्विंटल इतकी आवक झाली. त्यामुळे कांद्याच्या भावात घसरण झाली. नामपूरमध्ये सर्वाधिक २३४५ रुपये तर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
सटाणा बाजार समिती आवारातही कांद्याच्या आवकेत वाढ सुरूच असून, शुक्रवारी ६८५ वाहनांतून कांदा विक्र ीस आला होता. सरासरी एकवीस हजार क्विंटल इतकी कांदा आवक झाली. आवक वाढूनही कांद्याचे बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले. सरासरी २१०० रुपये, तर सर्वाधिक २४०० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
भाव पाडण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप
इजिप्तचा कांदा आयात करून कांद्याचे भाव पाडण्याचे सरकारचे षड्यंत्र असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी केला आहे. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नसल्याचे सांगून ज्याला कांदा महाग वाटत असले त्याने खाऊ नये. इजिप्तचा कांदा आयात करण्यासाठी आज प्रतिक्विंटल तीन हजार खर्च येणार आहे. आणि तो कांदा आठ दिवसांच्यावर टिकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा आयात म्हणजे सरकार, व्यापाºयांची मिलीभगत असल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: Falling onion continues to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.