एन दिवाळी सणाचे तोंडावर कांदा भावात घसरण झाल्यानेशेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:42 PM2018-10-30T16:42:36+5:302018-10-30T16:46:16+5:30
ब्राह्मणगाव : मागील आठवड्यात कांदा भाव सुधारला असता शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या व दिवाळी सण आनंदात जाईल हे दिवास्वप्नच ठरले आहे, कांद्याचा भाव एकदम २२०० वरून एक हजाराच्या आत येऊन ठेपल्याने शेतकरी वर्गात चिंतेचा सुर असून सर्वत्र नाराजी पसरली आहे.

आधीच दुष्काळाचे सावट आहे तो उन्हाळी कांदा च भविष्यात थोडाफार आर्थिक आधार देईल अशी अपेक्षा असताना व पाऊस न आल्याने विहिरी आटू लागल्या आहेत नवीन कांदा उत्पादन येईल याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. तेव्हा आहे तो कांदा ही भावात घसरण झाल्याने मातीमोल भावात विकावा लागत आहे. दिवाळी सण तोंडावर आला, अर्थकारण बिघडल्याने गोडधोड मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे, दुष्काळाचे सावट घर करू लागल्याने पुढील पावसाळा येई पर्यंत पिण्याचे पाणी व जनावरांना चारा कसा मिळेल याची ही चिंता वाढली आहे.
पुढील आठ मिहने किती भयानक संकट आहे याची चिंता सर्वत्र पसरली आहे मात्र राजकीय पक्षांना यांचे यित्कंचितही सोयरसुतक दिसत नाही. शेतकरी मात्र मेटकुटीस आला आहे, नाधड कर्ज माफी ना कुठली शासकीय मदत या कात्रित शेतकरी सापडल्याने राजकीय पक्षण बद्दल ही संताप व्यक्त केला जात आहे. तेव्हा आहे तो थोडाफार कांद्याला भाव वाढला तरच थोडाफार आर्थिक हातभार लागणार असून नाहीतर शेतकर्यांवरील. संकट वाढणार आहे. शेतकर्यांना बरोबर शेतमजूर ही अडचणीत येत आहे.