कांद्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:50 PM2020-05-21T21:50:52+5:302020-05-21T23:31:33+5:30

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

 Falling onion prices | कांद्याच्या दरात घसरण

कांद्याच्या दरात घसरण

Next

सायखेडा : (बाजीराव कमानकर ) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याची अनेक शेतकरी साठवणूक करत असतात मात्र चाळीमध्ये जागा नसल्याने उरलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला जातो. निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. उन्हाळ कांदा अवघा ४०० ते ६०० रु पये भावाने व्यापारी खरेदी करतात इतक्या कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे़ महागाई वाढल्याने कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो. बियाणे, रोप तयार करणे, शेतीची मशागत करणे, खते देणे औषधांची फवारणी करणे, खुरपणी करणे, कांदा कापणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येतो. शिवाय शेतकºयांना चार महिने पाणी द्यावे लागते, इतकी मेहनत करून कांदा कवडीमोल भावाने विक्री होत असल्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे.
कांदा शेतकºयांना अनेकदा रडायला लावतो. यंदा मात्र कोरोना रोगाचे संकट त्यात कोसळणारे भाव यामुळे शेतकरी मोठा अडचणी सापडला आहे
शेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ झाली की निर्यातबंदी,
शासन नियमात बदल, आंदोलन, संप अशा विविध अडचणीत हमखास येतात़
-----------------------------
क्विंटलला ५०० ते ६०० रुपये दर
निफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते, शिवाय काळी कसदार जमीन, योग्य हवामान त्यामुळे या परिसरातील लोक उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात. ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाला. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहातील; मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.
-------------------------
ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा सुलतानी संकटात यंदा कांदा पीक सापडले होते त्यामुळे उत्पादक घटले एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाले. त्यामुळे किमान दोन हजार रु पये भाव सरासरी मिळाला तर दोन पैसे शिल्लक रहातील मात्र अनेक दिवसांपासून कांद्याला अवघा पाचशे ते सहाशे रु पये भाव मिळत असल्याने वाहतूक खर्चदेखील वसूल होत नाही.
- चंद्रकांत रायते, शेतकरी, शिंगवे
-----------------------
कांदा निर्यात धोरण आणि शासनाच्या जाचक अटी, शर्ती, विविध बंधन यामुळे कांद्याचा बाजारभावात चढउतार होत असतो. सद्या कोरोनामुळे वाहतूक अडचणी वाढल्या आहे. शेतकºयांना चार पैसे मिळाले तर त्यात व्यापाºयालासुद्धा मिळतात त्यामुळे चार पैसे मिळून शेतकरी समाधानी राहावा, असा विचार व्यापारीवर्गाचा असतो; पण वेगवेगळ्या कारणामुळे बाजारभाव पडतात त्याचा फटका शेतकºयांना आणि व्यापारी या दोघांना बसतो. - अनंत भुतडा, कांदा व्यापारी, सायखेडा

Web Title:  Falling onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक