कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:33 PM2020-07-14T20:33:30+5:302020-07-15T01:16:26+5:30

लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व सरासरी भाव ७५१ रूपये जाहीर झाले.

Falling onion prices | कांदा दरात घसरण

कांदा दरात घसरण

Next

लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व सरासरी भाव ७५१ रूपये जाहीर झाले. बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बंद असलेले बाजार समितीत कांदा व धान्य लिलावाला सोमवारी सुरूवात झाली. सोमवारी कांद्याला जास्तीतजास्त ९७० रु पये ,सरासरी ७५० रु पये तर कमीतकमी ४०० रु पये मिळाला प्रतिक्विंटलला बाजार भाव जाहीर झाला.
कळवण येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे शेतकर्यांच्या भावना कळवाव्यात अशी विनंती केली़ गेल्या काही दिवसांपासून कांद्याबरोबरच शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भाजीपाल्याचे भावही कमी झाल्याने शेतकरी चिंंतातूर आहेत. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पवार, मविप्र संचालक अशोक पवार, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, जगन्नाथ पाटील, घनश्याम पवार, विनोद खैरनार,प्रविण जाधव,दादाजी जाधव हंसराज वाघ, माणिक देवरे, संजय शेवाळे,कौतिक गांगुर्डे यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
-------------------------------
प्रतिकिलो २० रु पये दर देण्याची मागणी
कळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि मधला जो दुरावा आहे तो शासनाने शेतकºयांच्या खात्यावर अदा करावा अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना दिले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ उपस्थित होते. कांदा उत्पादन खर्च ही निघत नसल्याने व कांदा कवडीमोल दराने विकला जात आहे. शासनाने कांदा खरेदी करून शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी देविदास पवार यांनी केली.
शेतकºयांचा कांदा उत्पादन खर्च ११ ते १२ रु पये येत असून कांदा आज ५ ते ६ रु पये दराने विकला जात आहे. यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. दर वाढल्यानंतर सरकार विदेशातून कांदा आयात करत दर पाडण्याचे काम करते. कांदा उत्पादकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने २० रु पये दराप्रमाणे कांदा खरेदी करून न्याय मिळवून द्यावा.

Web Title: Falling onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक