कांदा दरात घसरण; बळीराजा चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:39 PM2020-08-20T22:39:12+5:302020-08-21T00:32:53+5:30
दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी व नगदी भांडवल तयार करण्यासाठी साठविलेला उन्हाळा कांदा व लाल कांद्याने शेतकरीवर्गाची निराशा केली आहे. आशेपोटी बळीराजाने कांदा बाजारपेठेत नेला; पण भाव न मिळाल्याने हात डोक्याला लावावा लागत आहे.
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने आपल्या अडचणी सोडवण्यासाठी व नगदी भांडवल तयार करण्यासाठी साठविलेला उन्हाळा कांदा व लाल कांद्याने शेतकरीवर्गाची निराशा केली आहे. आशेपोटी बळीराजाने कांदा बाजारपेठेत नेला; पण भाव न मिळाल्याने हात डोक्याला लावावा लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरीवर्गाचा रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेला. भाजीपाल्यापासून ते द्राक्षे पिकापर्यंत कोणत्याही पिकाला योग्य हमीभाव या काळात न
भेटल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जवळ ठेवलेले सर्व भांडवल खर्च करूनही शेतकरीवर्गाच्या हातात काहीच मोबदला भेटला नाही. शेतीच्या भांडवलासाठी घेतलेले विविध बॅँकांचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत बळीराजा सापडला.
जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला प्रत्येक हंगामात अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. कोरोनाकाळात नगदी पैसा मिळविण्यासाठी शेतकरीवर्गाने
आपला साठविलेला उन्हाळा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत आणल्यानंतर मात्र कवडीमोल भावाने कांदा विकताना शेतकरीवर्गाच्या डोळ्यात अश्रू आले.
कांदा लिलावाचे कामकाज तीन दिवस बंद
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. २१ आॅगस्ट रोजी शुक्रवारी महाराष्टÑ राज्य बाजार समिती संघ लि., पुणे यांच्याकडील पत्रानुसार महाराष्टÑातील सर्व बाजार समित्यांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. कांदा, धान्य भुसार, डाळिंब, भाजीपाला व टमाटा या शेतीमालाचे लिलाव बंद राहाणार आहेत, अशी माहिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. शनिवारी (दि. २२) श्री गणेश चतुर्थी असल्याने कांदा व धान्य भुसार शेतमालाचे लिलाव बंद राहातील तर रविवारी साप्ताहिक सुट्टी राहील.