कांदा भावात घसरण, पिंपळगाव बसवंतला शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:22 PM2019-09-30T14:22:05+5:302019-09-30T14:35:20+5:30
पिपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये कांदा भावात सहाशे रूपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
पिपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये कांदा भावात सहाशे रूपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरूच आहे. मागील आठवड्यात कांदा प्रती क्विंटल ४८०० रूपयां पर्यत गेला होता. शुक्र वारी कांदा ३४५१ ते ३८७६ रूपयांपर्यत दर गेला. शनिवारी अमावस्या असल्याने व रविवार सुट्टी असल्याने बाजार समितीमध्ये फक्त कांदा निलाव बंद होता. केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णय व व्यापारी वर्गांने पाचशे क्विंटलच्यावर मालाची साठवून अशा अटी घातल्यामुळे सोमवारी कांदा निलाव सुरळित सुरू झाला, मात्र कांदा बाजार भावात कमालीची घसरण झाली. दोनच दिवसात कांदा २८०० ते ३३५० रूपयांपर्यंत गेला. जवळपास ६०० रूपये प्रती क्विंटल दराने घसरण झाल्याने शेतकरी वर्ग केद्र सरकारच्या या निर्णयाने संतापला आहे. गेली पाच ते सहा महिन्यापासून साठवून ठेवलेला कांदा हा पावसाच्या वातावरणाने पन्नास टक्के खराब झाला आहे.