आठवड्यात कांदा भावात घसरण

By admin | Published: July 22, 2014 11:17 PM2014-07-22T23:17:49+5:302014-07-23T00:31:18+5:30

आठवड्यात कांदा भावात घसरण

Falling onions in the week | आठवड्यात कांदा भावात घसरण

आठवड्यात कांदा भावात घसरण

Next

पिंपळगाव बसवंत : केंद्र सरकारने कांद्याला जीवनावश्यक वस्तूत समावेश करून निर्यातमूल्य ३०० वरून ५०० रुपये केल्यापासून कांद्याला उतारती कळा लागली आहे. गेल्या आठ दिवसांत कांद्याची ५०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कांद्याचा बाजारभाव वाढण्याची शंका वाटू लागताच केंद्र सरकारने कांद्यावर निर्बंध घातला. जीवनावश्यक वस्तूत समावेश करून कृषी प्रधान देशाचा बळीराजाला घरचा अहेर दिला. निर्यातमूल्य ३०० वरून ५०० गेले. त्यातच व्यापारी रेल्वे भाववाढीचा फटका शेतकऱ्यांच्या मुळावरच बसला असून, मागील सप्ताहात कांद्याला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. सरासरी १९०० ते २००० पर्यंत मिळत होता. चालू सप्ताहात कांद्याला २२०० ते २२५०पर्यंत मिळत असून, सरासरी १९०० पर्यंत मिळत आहे. चार महिने साठवून ठेवलेला माल त्यातच गारपिटीने नुकसान झालेला कांद्याला बाजारभाव मिळेल हा हेतू बाळगून शेतकरी आशावादी होता. मात्र, आठ दिवसांची घसरण घेतल्यावर आर्थिक संकट कोसळणारी ठरत आहे.
पाकिस्तानचा कांदा अमृतसर बाजार समितीमध्ये दाखल झाला असून, मलेशिया, बांगलादेश या देशातूनही कांदा येण्याची भीती व्यापारीवर्गाला असून, त्यातच सोशल मीडियाची कांद्यावर केलेली पकड ही शेतकरी, व्यापारी व बाजार समित्यांना मारक ठरत आहे. कांद्याला सरकार का महत्त्व देते, शेतकरीवर्गांना अडीअडचणीतून दोन पैसे मिळत आहे. त्यातच केंद्राचे शेतकऱ्याबाबत धोरण चुकीचे ठरत असल्याने कांद्याचा बाजारभाव कमी होत आहे.
(वार्ताहर)

Web Title: Falling onions in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.