लाल कांद्याच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 04:08 PM2019-01-07T16:08:39+5:302019-01-07T16:08:47+5:30

सायखेडा : उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांचे वांदे केल्यानंतर खरीप हंगामातील लाल कांद्याला भाव मिळून बेभवात विकलेल्या उन्हाळ कांद्याचा तोटा भरून निघेल अशी अपेक्षा असलेल्या शेतक-यांची घोर निराशा झाली आहे.

Falling on red onion prices | लाल कांद्याच्या भावात घसरण

लाल कांद्याच्या भावात घसरण

Next

सायखेडा : उन्हाळ कांद्याने शेतकऱ्यांचे वांदे केल्यानंतर खरीप हंगामातील लाल कांद्याला भाव मिळून बेभवात विकलेल्या उन्हाळ कांद्याचा तोटा भरून निघेल अशी अपेक्षा असलेल्या शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. हंगाम सुरु झाल्यापासून कांद्याचे भाव गडगडले आहे. केंद्र सरकारने निर्यात अनुदानात पाच टक्कयांवरून दहा टक्के वाढ करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला मात्र या निर्णयाचा फायदा केवळ दोन दिवस झाला. दोन दिवस कांद्याच्या भावात सुधारणा झाली मात्र भाव पुन्हा कोसळल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
सायखेडा बाजार समितीत सोमवारी ६०० ते ७२५ रूपये क्विंटल कांदा विकला गेला. फारशी आवक नसतानाही भाव मात्र वाढत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहे. उन्हाळ कांद्याची विक्र मी आवक वर्षभर बाजार समितीत दिसून आली. शिवाय पर्जन्य कमी झाल्याने कांदा खराब झाला नाही. आठ महिने चाळीत साठवलेला कांदा आजही कोरा निघत आहे. त्यामुळे आवक टिकून राहील. बाजार भाव वर्षभर घसरले. यंदा लोकसभेच्या निवडणूक असल्याने कांद्याला भाव राहील या आशेने कांद्याची लागवड वाढली, पाऊस कमी होऊनही लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. शिवाय इतर राज्यात कांद्याचे पीक चांगले आले. त्यामुळे कांद्याच्या भावात कोणतीही सुधारणा झाली नाही मात्र तीन राज्यात भाजपाची पीछेहाट झाल्याने शेतकरी नाराज झाले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे भाव वाढीसाठी प्रयत्न केले जाऊ लागल. निर्यातमूल्य वाढवले पण केवळ दोनच दिवस भाव मिळाला.

Web Title: Falling on red onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक