टोमॅटोच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:12 PM2018-11-25T18:12:43+5:302018-11-25T18:13:09+5:30

सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्टयात टोमॅटोचे पीक चांगल्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

Falling tomatoes | टोमॅटोच्या भावात घसरण

टोमॅटोच्या भावात घसरण

Next

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्टयात टोमॅटोचे पीक चांगल्या प्रमाणात घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे. सुरूवातीच्या काळात टोमॅटो काढण्याच्या वेळी शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात भाव मिळाला होता. मात्र मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात अचानक घसरण सुरु झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. साधारणत: एकरी ६० ते ७० हजारांपर्यंत खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले. पंरतु ऐन दिवाळीपासून टोमॅटो दरात घसरण सुरू झाली. पांढुर्ली उपबाजारात आवारात ज्यूससाठी मातीमोल भावाने शेतकरी टोमॅटो विकताना दिसत आहे. त्यामुळे बाजारभाव गडगडले असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याचे चित्र आहे.

Web Title: Falling tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.