फुलेनगरला आगीत तीन घरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:10 AM2019-04-13T01:10:55+5:302019-04-13T01:12:53+5:30
नांदगाव : शहरापासून ३ किमी अंतरावर नांदगाव-मनमाड रोडवरील फुलेनगर येथे आदिवासी पाड्यावरील राहत्या घरांना अचानक आग लागली. त्यात तीन घरे जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी नागरिकांनी घरात पिण्यासाठी भरून ठेवलेल्या हंड्यांतील पाणी वापरले; मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यात संसारोपयोगी वस्तू व धान्य, कपडे जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.
नांदगाव : फुलेनगर येथे घरांना लागलेली आग.
नांदगाव : शहरापासून ३ किमी अंतरावर नांदगाव-मनमाड रोडवरील फुलेनगर येथे आदिवासी पाड्यावरील राहत्या घरांना अचानक आग लागली. त्यात तीन घरे जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी नागरिकांनी घरात पिण्यासाठी भरून ठेवलेल्या हंड्यांतील पाणी वापरले; मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यात संसारोपयोगी वस्तू व धान्य, कपडे जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.
यात रामदास माळी, खंडू माळी, विश्वनाथ पवार यांची घरे जळून संसारोपयोगी वस्तू, कपडे, धान्य खाक झाले. अग्निशमन बंब वेळेत पोहोचू शकले नाही त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळ लागला. याप्रसंगी ज्ञानेश्वर जगधने, दीपक जगधने, अशोक जगधने, खंडू माळी, आबा पाटील आदींसह नागरिकांनी आग विझविण्यास प्रयत्न केला.