उपविभागीय कार्यालयांनी दिले जातीचे चुकीचे दाखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 10:29 PM2020-12-30T22:29:47+5:302020-12-31T00:21:11+5:30

नांदगांव : येवला, चांदवड, निफाड व इगतपुरी प्रांत कार्यालयातून उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कानडी / कानडे जातीचे दाखले चुकीचे देत असल्याचा आक्षेप कानडे/कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बोगिर यांनी केला आहे.

False caste certificates issued by sub-divisional offices | उपविभागीय कार्यालयांनी दिले जातीचे चुकीचे दाखले

उपविभागीय कार्यालयांनी दिले जातीचे चुकीचे दाखले

googlenewsNext
ठळक मुद्देदाखल्यांच्या प्रती व कार्यालयीन यादी मिळावी, म्हणून मागणी

नांदगांव : येवला, चांदवड, निफाड व इगतपुरी प्रांत कार्यालयातून उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कानडी / कानडे
जातीचे दाखले चुकीचे देत असल्याचा आक्षेप कानडे/कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बोगिर यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी माहितीच्या अधिकारात येवला व सिन्नर तालुक्याचे प्रांत कार्यालयात माहिती विचारलेली आहे. अनुक्रमांक ३५१ कानडी/कानडे ओबीसी ही जात नांदेड, हिंगोली क्षेत्रात वास्तव्य करते. सदर जात दिनांक ४/ ६/ २०१९च्या मागासवर्गीय आयोग पुणे यांच्या अहवालानुसार, मागासवर्गीयांच्या यादीत अनुक्रमांक ४५१वर समाविष्ट केलेली आहे, परंतु सदर जातीचे दाखले धनगर तत्सम जमातीतील कानडे/कानडी (२९/१३) एनटीसी या जमातीला देण्यात आलेले आहेत.

या संदर्भात बोगीर यांनी किती अर्जदारांना अनुक्रमांक ३५१ वरील कानडी/ कानडे (ओबीसी) दाखले दिले. याबाबत जतन केलेल्या दाखल्यांच्या प्रती व कार्यालयीन यादी मिळावी, म्हणून मागणी केलेली आहे.

Web Title: False caste certificates issued by sub-divisional offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.