मुलगा सांगून मुलगी हातात दिली, बाळाच्या कुटुंबीयांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:25 PM2024-10-17T15:25:52+5:302024-10-17T15:34:08+5:30

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी याबाबत चौकशी समिती नेमून सीसीटीव्हीसह अन्य बाबींची तपासणी केली असता बाळाला लावण्यात येणाऱ्या 'टॅग' सह रजिस्टरमध्ये 'एफ' ऐवजी 'एम' लिहिले गेल्याने घोळ झाला होता.

family accused the hospital of giving custody of the girl instead of the boy in nashik | मुलगा सांगून मुलगी हातात दिली, बाळाच्या कुटुंबीयांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ

मुलगा सांगून मुलगी हातात दिली, बाळाच्या कुटुंबीयांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि. १३) रात्री जन्मलेले अर्भक मुलगा असल्याचे मातेसह कुटुंबीयांना सांगून सर्वत्र मुलगा अशीच नोंददेखील केलेली होती. मात्र, काचेच्या पेटीत उपचारासाठी ठेवलेल्या बाळाला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी बुधवारी (दि.१६) रितसर बाळाचा ताबा देताना सिव्हिलमधील स्टाफने मुलगी हातात दिल्याने बाळाच्या आईसह कुटुंबीय आणि नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. त्यामुळे गदारोळ होऊन पालकांनी बाळ स्विकारण्यास नकार दिला.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी याबाबत चौकशी समिती नेमून सीसीटीव्हीसह अन्य बाबींची तपासणी केली असता बाळाला लावण्यात येणाऱ्या 'टॅग' सह रजिस्टरमध्ये 'एफ' ऐवजी 'एम' लिहिले गेल्याने घोळ झाला होता. याबाबत ५ डॉक्टर, ३ प्रशिक्षणार्थी डॉक्टर, ४ नर्स आणि १ मावशीवर कारवाई करण्यात आल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. शिंदे यांनी सांगितले.

नांदूर नाका परिसरातील रहिवासी असलेल्या प्रिया ऋषीकेश पवार या महिलेला प्रसूतीसाठी रविवारी (दि. १३) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  रात्री ११:३० च्या सुमारास या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांनी नैसर्गिक प्रसूती केली. त्यावेळी मातेला तसेच कुटुंबीयांना मुलगा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी मातेने बाळाला स्वतःजवळ देण्याची विनंती केली असता बाळाला साफ करायचे असून, बाळाच्या पोटात शी गेल्याने त्याला काचेच्या पेटीत ठेवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार बाळाला तातडीने नवजात अर्भक दक्षता विभागामध्ये काचेच्या पेटीत ठेवून उपचार सुरू करण्यात आले. 

मात्र, बाळाची तब्येत बिघडत असल्याचे सांगितल्यावर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यास सांगितले. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नर्सनी बाळ कुटुंबीयांच्या हातात देण्यात आले. त्यावेळी बाळाचे डायपर बदलत असताना बाळ मुलगा नव्हे तर मुलगी असल्याची बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावर प्रारंभी सिव्हीलमधील संबंधित कर्मचाऱ्यांनी मुलगीच झाली होती, असे सांगित असता कुटुंबीयांच्या संतापाचा उद्रे झाला. तसेच सिव्हीलच्या रजिस्टरस सर्वत्र मुलगा झाल्याची नोंददेखी निदर्शनास आणून देत तातडीने मुलग् परत देण्याची मागणी केली. दरम्यान ही बाब जिल्हा शल्यचिकित्सकांपर्यं पोहोचल्यानंतर त्यांनी टॅगस कागदोपत्री मुलगा अशीच नों असल्याचे सांगितले. तसेच चौकश् समितीदेखील गठित करण्यात आल होती.

"या प्रकरणाबाबत तत्काळ चौकशी समिती नेमण्यात आली असून समितीने सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्याबाबत चौकशी समितीकडून तपासणी करून काय तथ्य आहे, त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे निर्देश दिले होते. तसेच सीसीटीव्ह फुटेज आणि अन्य बाबींची सखोल चौकशी, शहानिशा करण्यात आली. जन्माला आलेली मुलगी असून देखील टॅगसह केसपेपरवर बाळाची मुलगा अशीच नोंद झाली होती. ती नोंद करण्यातच चूक झाल्याचे चौकशी अंती निदर्शनास आले. त्यामुळे ५ डॉक्टर, ३ प्रशिक्षणार्थी डॉक्टर, ४ नर्स आणि १ मावशीवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी बाळाची डीएना टेस्ट करण्यात येईल. पालकांना विश्वास वाटल्याने त्यांनी बाळ स्विकारले आहे. 
 

- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सव

"रविवारी रात्री प्रसूती झाल्यानंतर तत्काळ मुलगा झाल्याचे मला आणि कुटुंबीयांना सांगितले. तसेच सर्व कागदपत्रांवर मुलगा अशीच नोंद असूनही आज हातात दिलेले बाळ मुलगी असल्याचे दिसले. तत्काळ न्याय देऊन आमचे बाळ आम्हाला द्यावे तसेच दोषींवर कारवाई व्हावी हीच मागणी आहे.
 

 - प्रिया ऋषिकेश पवार, बाळाची माता

Web Title: family accused the hospital of giving custody of the girl instead of the boy in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.