बहिष्कृत दांपत्याचा कुटुंबीयाने केला स्वीकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:11 PM2018-07-18T23:11:42+5:302018-07-18T23:14:53+5:30

सटाणा : प्रेमविवाह केल्यामुळे बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजातील नवदांपत्याला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याच्या धक्कादायक घटनेवर सोमवारी (दि. १६) पडदा पडला. वैदू समाजाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमृता पवार यांनी येथील तहसील आवारात संबंधित तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांची बैठक घेत समजूत काढली आणि जातपंचायतीच्या कायद्याची सखोल माहिती पीडितांच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर दोघांच्या जीवनात हस्तक्षेप न करता सर्वांनी यापुढे गुण्यागोविंदाने राहण्याचे आश्वासन नातेवाइकांनी दिल्याने दांपत्याने पोलिसांत दिलेला तक्रार अर्ज मागे घेतला आहे.

The family of the disfellowshipped husband admitted | बहिष्कृत दांपत्याचा कुटुंबीयाने केला स्वीकार

बहिष्कृत दांपत्याचा कुटुंबीयाने केला स्वीकार

Next
ठळक मुद्देतक्रार मागे : वैदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप

सटाणा : प्रेमविवाह केल्यामुळे बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजातील नवदांपत्याला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याच्या धक्कादायक घटनेवर सोमवारी (दि. १६) पडदा पडला. वैदू समाजाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमृता पवार यांनी येथील तहसील आवारात संबंधित तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांची बैठक घेत समजूत काढली आणि जातपंचायतीच्या कायद्याची सखोल माहिती पीडितांच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर दोघांच्या जीवनात हस्तक्षेप न करता सर्वांनी यापुढे गुण्यागोविंदाने राहण्याचे आश्वासन नातेवाइकांनी दिल्याने दांपत्याने पोलिसांत दिलेला तक्रार अर्ज मागे घेतला आहे.
पीडित दांपत्याने मालेगाव येथील महिला समुपदेशन केंद्रात जातपंचायतीच्या सहा जणांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. सदरचा तक्रार अर्ज सटाणा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी सटाणा पोलिसांनी सुनंदा आणि दिनेश पवार यांना जबाब घेण्यासाठी १४ जुलै रोजी पोलीस ठाण्यात बोलावले होते. गुन्हा नोंदवायचा की नाही, याबाबत निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्याची मागणी दोघांनी पोलिसांकडे केली होती.
दोन दिवसांची मुदत सोमवारी संपल्याने पवार दांपत्याने पोलीस ठाण्यात हजर होण्याआधी त्यांच्या दोघांच्या कुटुंबीयांसह वैदू समाजाचे राज्य उपाध्यक्ष अमृता पवार यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत दोन्ही कुटुंबीयांनी यापुढे दोघांना आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जे झाले ते आता विसरून जाण्याची विनंती दोघांना करत पोलिसांत गुन्हा दाखल न करता सामोपचाराने प्रकरण मिटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र यापुढील काळात कोणी आम्हाला वाळीत किंवा बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा इशारादेखील या दांपत्याने नातेवाइकांना दिला आहे. त्यानंतर सुनंदा व दिनेश यांनी सटाणा पोलिसांत दिलेला तक्रार अर्ज निकाली काढण्याची लेखी विनंती केली. यावेळी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र
शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा, पोलीस कर्मचारी प्रकाश शिंदे, पुंडलिक डंबाळे, योगेश गुंजाळ यांनी दोन्ही परिवारांचे समुपदेशन केले.
सामोपचाराची भूमिका
मळगाव येथील दिनेश गोविंद पवार व सुनंदा पवार यांनी २ जानेवारीला कुटुंबीयांच्या संमतीने प्रेमविवाह केला होता. या विवाहाला वैदू जातपंचायतीने विरोध दर्शवित दांपत्याला समाजातून बहिष्कृत करत त्यांना सामाजिक कार्यक्रमांपासून वंचित ठेवले जात असल्याने पवार दांपत्याने मालेगाव महिला समुपदेशन केंद्राकडे तक्र ार केली होती. जातपंचायतीचे अशोक मल्लू पवार, पिराजी गोपाळ पवार, शंकर महादू पवार, सोमा रामा हटकर, तायबा महादू हटकर, मारूती मच्छिंद्र हटकर यांनी हा प्रकार केल्याचा आरोप तक्र ार अर्जाद्वारे केला होता. जिल्हाभर हे प्रकरण गाजत असताना अखेर सोमवारी पवार दांपत्याच्या नातेवाइकांनी सामोपचाराची भूमिका घेत यापुढे असा प्रकार घडणार नाही तसेच वैदू समाजाचे राज्य उपाध्यक्ष अमृता पवार यांच्यासह पोलीस दलात कार्यरत मळगाव येथील भास्कर ठोके यांच्या मध्यस्थीने एक पाऊल मागे आले.

Web Title: The family of the disfellowshipped husband admitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक