फॅमिली डॉक्टर हा सर्वांसाठी आरोग्य व्यवस्थेचा कणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:39 AM2019-05-14T01:39:19+5:302019-05-14T01:39:37+5:30
फॅमिली डॉक्टर हा आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, प्रत्येक डॉक्टरने प्रामाणिकपणे निदान व उपचार केल्यास आरोग्यावर होणारा प्रशासकीय खर्च प्रचंड प्रमाणात कमी होईल.
नाशिक : फॅमिली डॉक्टर हा आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, प्रत्येक डॉक्टरने प्रामाणिकपणे निदान व उपचार केल्यास आरोग्यावर होणारा प्रशासकीय खर्च प्रचंड प्रमाणात कमी होईल. आपले प्रिस्क्रिप्शन तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण ठेवल्यास कायदेशीर बाबींपासूनही तुम्ही दूर रहाल, असे प्रतिपादन नाशिक मनपाचे सहा. आरोग्याधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी केले.
नव्यानेच स्थापन झालेल्या मध्य नाशिक जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा शुभारंभ व नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉ. रफिक शेख होते. यावेळी व्यासपीठावर श्रीजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. आवारे उपस्थित होते.
नवनियुक्त कार्यकारिणीचा विविध वैद्यकीय संघटना आणि संस्थांचा डॉ. धनंजय कदम या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. लियाकत नामोले यांनी केले तर डॉ. हाफीज शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. नदीम पठाण, डॉ. बिपीन पटेल, डॉ. मिलिंद बढे, डॉ. झाकीर खान आदी उपस्थित होते.
कार्यकारिणीचा सत्कार
जेएमसीटी ट्रस्टच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्र मात असोसिएशनच्या पदाधिकारी, सुकाणू समिती आणि कार्यकारी समिती सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात अध्यक्ष- डॉ. रफिक शेख, उपाध्यक्ष- डॉ. सुनील औंधकर, सचिव- डॉ. आसिफ सय्यद, कार्याध्यक्ष- डॉ. हाफीज शेख, खजिनदार- डॉ. तारिक कुरेशी आणि सहकाऱ्यांचा समावेश होता.