सत्काराने गहिवरले सैनिकांचे कुटुंबीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:50 PM2020-02-22T22:50:28+5:302020-02-23T00:24:20+5:30
जळगाव नेऊर विद्यालयाच्या प्रांगणात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना प्रसंगी भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढत असलेल्या सैनिक कुटुंब, वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांचे कुटुंबांना गहिवरुन आले.
जळगाव नेऊर : येथील जळगाव नेऊर विद्यालयाच्या प्रांगणात पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना प्रसंगी भारत मातेच्या रक्षणासाठी सिमेवर लढत असलेल्या सैनिक कुटुंब, वीरमाता, वीरपत्नी, आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिकांचे कुटुंबांना गहिवरुन आले.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील शहिद सैनिकांच्या वीरपत्नी भारती पगार, रेखा गोरडे, वर्षा चौधरी, सुभामा मोरे, रु पाली बच्छाव, रेखा खैरनार, कल्पना रैंदळ, हिराबाई चव्हाण, अनीता शेळके, विरमाता पुष्पाबाई कदम, सैनिक पत्नी कांचन शिंदे, विरचक्र विजेते कचरु साळवे,१९६५ व १९७१च्या युद्धात सहभागी असलेले जगन्नाथ शिरसाठ, कालगील युद्धातील सोन्याबापू शिंदे, सुदाम आमराळे, माजी सैनिक संदीप शिंदे, योगेश शिंदे, गोकुळ तांबे, सचिन कदम, दिनकर शेळके, सचिन शिंदे, अशोक ठोके, लक्ष्मण सातभाई, गोकुळ बनसोडे, पांडुरंग सोनवणे, राजेंद्र दाते, गणेश चव्हाणके, सैन्य दलातील सचिन बोरनारे, धोंडीराम सोनवणे, अक्षय व्यापारी, अंकुश ठोंबरे, मोहन जाधव, प्रविण बोराडे, योगेश बोराडे, गोरख तांबे, भरत तांबे, विकास वरे, पोलिस दलातील भरत दाते, रोहिदास ठोंबरे, शरद दाते, मच्छिंद्र पठारे आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.