सुख-दु:खे वाटून घेणारा कोरोनाबाधितांचा कुटुंबकबिला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:59 AM2020-08-17T00:59:58+5:302020-08-17T01:00:16+5:30

आयुष्यात अनोळखी लोकांसमवेत काही तास एकत्र येण्याची वेळ सामान्य माणसांवर केवळ रेल्वे किंवा बसच्या प्रवासात येते. मात्र काही तास नव्हे, तर तब्बल दहा ते बारा दिवस संपूर्णपणे अनोळखी व्यक्तींच्या सहवासात राहण्याची वेळ कोरोनाने हजारो नागरिकांवर आणली आहे.

Family members of Korona victims who share happiness and sorrow! | सुख-दु:खे वाटून घेणारा कोरोनाबाधितांचा कुटुंबकबिला!

सुख-दु:खे वाटून घेणारा कोरोनाबाधितांचा कुटुंबकबिला!

Next
ठळक मुद्देपारिवारिक भावना : परिचारिकांमध्ये भगिनी, तर डॉक्टरांमध्ये दिसतो मोठा भाऊ

नाशिक : आयुष्यात अनोळखी लोकांसमवेत काही तास एकत्र येण्याची वेळ सामान्य माणसांवर केवळ रेल्वे किंवा बसच्या प्रवासात येते. मात्र काही तास नव्हे, तर तब्बल दहा ते बारा दिवस संपूर्णपणे अनोळखी व्यक्तींच्या सहवासात राहण्याची वेळ कोरोनाने हजारो नागरिकांवर आणली आहे.
कोरोनाग्रस्त अपरिचित नागरिकांना जेव्हा दहा ते बारा दिवस एकत्र राहण्याची वेळ येते, त्यावेळी ते आपसूकच एकमेकांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड बनत जातात. कारण या कठीण प्रसंगात कुटुंबीय केवळ फोनवरच उपलब्ध असल्याने मग हीच आसपासची माणसं कुणी काका, कुणी दादा, कुणी भाऊ, कुणी आजोबा अशा विविध नात्यांमध्ये बांधली जातात. एक प्रकारे या अनोळखी अपरिचित माणसांचा जणू कुटुंबकबिलाच क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये तयार होतो. कधी कुणाचं डोकं दुखत असतं, अचानकपणे कुणाला घाबरल्यासारखे झालेलं असतं, कुणाला श्वास घ्यायला त्रास होत असतो, कुणी सतत खोकत असतं.
असा सगळ्या दुखर्या जीवांचा आणि हळव्या मनांचा कुटुंबकबिला मग एकमेकांच्या सुख-दु:खाच्या भावना शेअर करत एकेक दिवस काढू लागतात. शारीरिकपेक्षाही मानसिक आधाराची अधिक गरज असलेल्या या आजारात आस्थेने विचारपूस करणारी सिस्टर ही खरोखरच आपल्या सख्ख्या बहिणीसारखी वाटायला लागते . तर वेळेत गोळी न घेणाऱ्यांना खडसावणारे डॉक्टर आपसूकच मोठ्या भावासारखे वाटू लागतात. खरोखर हा एक गोतावळा म्हणजे कोरोनाग्रस्तांचा कुटुंबकबिला झालेला आहे
अभूतपूर्व राष्ट्रगीत गायन
कुणा आजोबांना उठताही येत नाही, कुणाला थोडा वेळ उभे राहिल्यावर चक्कर येते अशी काहींची स्थिती. आयुष्यात यानंतर पुन्हा स्वातंत्र्यदिन पहायला मिळेल की नाही याची बहुतेकांच्या मनात साशंकता आणि धाकधुक. मात्र, त्या स्थितीतही राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहून ज्येष्ठ नागरिक जेव्हा कडक आवाजात भारतमाता की जय आणि जय हिंद असा नारा देतात, त्यावेळी ऐकणाºयाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. कडक सलाम करण्यासाठी मग प्रत्येकाचाच हात आपसूकपणे वर जातो. एका क्वॉरण्टाइन सेंटरमधील हा क्षण होता.

Web Title: Family members of Korona victims who share happiness and sorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.