संकटात कुटुंबीयांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:17 PM2020-04-19T23:17:23+5:302020-04-19T23:17:53+5:30
कोरोनाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असंख्य शेतमजूर आपल्या गावी परत गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उपलब्ध शेतमजुरांनाही कोरोनाच्या भीतीमुळे शेतात काम करण्यास मज्जाव केला जात असल्याने शेतातील सर्व कामे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच करावे लागत आहे.
पिंपळगाव बसवंत : कोरोनाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असंख्य शेतमजूर आपल्या गावी परत गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. उपलब्ध शेतमजुरांनाही कोरोनाच्या भीतीमुळे शेतात काम करण्यास मज्जाव केला जात असल्याने शेतातील सर्व कामे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच करावे लागत आहे.
द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना अवकाळीपाठोपाठ कोरोना व्हायरसच्या लॉकडाउनचा मोठा फटका सहन लागत आहे. पिंपळगाव बसवंतसह निफाड, लोणवाडी, दावचवाडी, नारायण टेंभी, मुखेड, अंतरवेली, पाचोरे वणी, दिंडोरी या भागात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक मानले जात आहे. कोरोनाच्या धास्तीने आदिवासी भागातून आलेला मजूरवर्ग आपल्या गावी परतल्याने शेतकºयांना शेतीकामात कुटुंबीयांची मदत घ्यावी लागत आहे. बेदाणा निर्मितीसाठी शेतकºयांना मजुरांची आवश्यकता भासते मात्र यंदा कुटुंबातील सदस्यांच सोबत घेऊन काम उरकण्याची वेळ अनेक शेतकºयांवर आली आहे.
कुटुंबाचा चालक खचला तर संपूर्ण कुटुंब खचते. अशावेळी कुटुंबातील सदस्यांनी कुटुंबचालकाला आधार दिला पाहिजे. कोरोनामुळे द्राक्षाचे झालेले नुकसान न भरून निघणारे आहे; मात्र माझे सर्व कुटुंब माझ्यासोबत असल्याने नुकसान भरून काढण्यासाठी ताकत मिळत आहे.
- केशव बनकर, द्राक्ष उत्पादक