येवल्यात कुटुंब सर्वेक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:04+5:302021-05-01T04:13:04+5:30
तालुक्यातील १२४ गावांमध्ये ३२२ पथकांतील ९८६ सदस्यांव्दारे ही मोहीम राबविली जात आहे. २ मे पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत तालुक्यातील ...
तालुक्यातील १२४ गावांमध्ये ३२२ पथकांतील ९८६ सदस्यांव्दारे ही मोहीम राबविली जात आहे.
२ मे पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत तालुक्यातील सुमारे ४६ हजार ३२९ कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार असून सर्वेक्षण पथकातील शिक्षक, अंगणवाडीसेविका व आशासेविका घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीचे ऑक्सिजन व ताप याचे मोजमाप करतील. तसेच कोमॉर्बिड व्यक्तींचीही नोंद घेतील. या सर्वेक्षणामुळे तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण राखण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार प्रांताधिकारी सोपान कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. २९) तहसीलदार प्रमोद हिले यांनी तालुक्यातील चिचोंडी व एरंडगाव बुद्रुक येथे भेट देऊन सर्वेक्षण कामकाजाची पाहणी करून पथकाला मार्गदर्शन केले. याप्रसंगी जालिंदर गावडे, कविता पडोळ, छायाबाई गोसावी, योगेश उराडे, कमलेश निर्मळ आदी उपस्थित होते.
फोटो- २९ येवला सर्वे
===Photopath===
290421\534729nsk_36_29042021_13.jpg
===Caption===
फोटो- २९ येवला सर्वे