कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:37 PM2020-02-19T22:37:52+5:302020-02-20T00:14:27+5:30

जळगाव नेऊर : येथे सव्वा कोटी रु पये खर्च करून बांधण्यात आलेले सुसज्ज कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाºयांच्या प्रतीक्षेत आहे. ...

Family Welfare Substance staff waiting | कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत

एरंडगाव येथील कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले कुटुंब कल्याण उपकेंद्र.

Next
ठळक मुद्देगैरसोय : रु ग्णालयाची सेवा सुरू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

जळगाव नेऊर : येथे सव्वा कोटी रु पये खर्च करून बांधण्यात आलेले सुसज्ज कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाºयांच्या प्रतीक्षेत आहे. येथे त्वरित कर्मचाºयांची नेमणूक करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेमार्फत येथे सुसज्ज दुमजली कुटुंब कल्याण उपकेंद्र बांधण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते १९ जानेवारी २०१९ रोजी या उपकेंद्राचे उद्घाटन झाले. स्वागतकक्ष, तपासणी कक्ष, शस्रक्रि या कक्ष, औषध विभाग, रु ग्ण उपचार कक्ष व डॉक्टरांसाठी दुसºया मजल्यावर स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. उपकेंद्राच्या परिसरात पथदीप बसविण्यात आले आहे, परंतु ते बंद अवस्थेत आहेत. या उपकेंद्रासाठी आजपर्यंत एकाही कर्मचाºयाची नेमणूक केलेली नसल्यामुळे हे रुग्णालय धूळ खात पडले आहे. विघ्नसंतुष्ट लोकांनी या रुग्णालयाच्या खिडक्यांच्या आकर्षक काचाही फोडल्या आहेत. तसेच रुग्णालयाच्या छतावर पाण्यासाठी बसविण्यात आलेली पाण्याची टाकीही अज्ञाताने चोरून नेली आहे. या इमारतीस पक्के कुंपण नसल्याने गावातील महिला व पुरुष इमारतीवर शौचालयास बसतात.

सामान्य रु ग्णांना मिळेल दिलासा
नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत हे गाव असल्याने परिसरातील अनेक गावांचा या गावाशी संबंध येतो. दवाखाना सुरू झाल्यास परिसरातील महिलांच्या प्रसूतीची उत्तम सोय या ठिकाणी होईल. तसेच इतर आजारांवरही प्रथमोपचार या ठिकाणी केले जातील. त्यामुळे सामान्य रु ग्णांना दिलासा मिळेल. रु ग्णालय असूनही अधिकारी व कर्मचारी नसल्याने परिसरातील महिलांना तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी जावे लागते. अशा रु ग्णालयांचा खर्च सामान्य कुटुंबांना पेलवत नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या उपकेंद्रासाठी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देऊन रु ग्णालयाची सेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्हा परिषदेने महिलांच्या प्रसूतीसाठी येथे सुसज्ज असे कुटुंब कल्याण उपकेंद्र उभारले आहे. या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची लवकरात लवकर नेमणूक करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे शासनदरबारी प्रयत्न केले जातील व लवकरच हे रुग्णालय सेवेत दाखल होईल.
- सुमय्या पटेल, सरपंच, एरंडगाव बुद्रुक.

Web Title: Family Welfare Substance staff waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य