विख्यात गणितज्ज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 03:27 PM2020-12-29T15:27:42+5:302020-12-29T15:33:00+5:30
नाशिक- विख्यात गणितज्ज्ञ आणि पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.२९) सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. गणितासारखा विषय सहज सोप्या पध्दतीने शिकवणारे आणि अन्य अनेक संस्थांशी निगडीत असलेल्या गोटखिंडीकर यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
नाशिक- विख्यात गणितज्ज्ञ आणि पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.२९) सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. गणितासारखा विषय सहज सोप्या पध्दतीने शिकवणारे आणि अन्य अनेक संस्थांशी निगडीत असलेल्या गोटखिंडीकर यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
दोन महिन्यांपूर्वी हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यंसस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा गोटखिंडीकर, मुलगा अजेय, मुलगी अर्चना दीक्षीत यांच्यासह सून, जावई, नातवंडे असा परीवार आहे.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठेे हायस्कूलमध्ये अध्यापन करतानाच गणित विषय शिकवण्याच्या त्यांच्या कौशल्याने ते विद्यार्थीप्रिय होते. शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अनेक संस्थांवर त्यांनी काम केले. थोर गणितज्ज्ञ (कै.) दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांच्या बरोबर त्यांनी नऊ वर्षे कार्य केले. १९८४ पासून ते इंडीयन मॅथेमँटीकल सोसायटीचे ते सदस्य होते. त्याच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ, मराठी विज्ञान परीषद अशा अनेक संस्थांवर त्यांची पदाधिकारी आणि तज्ज्ञ म्हणून काम केले. राज्य शासनाच्या भास्कराचार्य गणित नगरीचे ते संयोजक समिती सदस्य होते. त्यांनी एकुण ७० पुस्तके लिहीलेले असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबरोबरच अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी दृकश्राव्य साधनांची निर्मिती केली. तसेच दिल्ली, कोटा बरोबरच तुर्कस्थान, फिनलँड येथे गणित आणि शिक्षण विषयक परीषदेतही त्यांचा सहाभाग होता.