फांगदर शाळा भरणार मंगळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:04 PM2019-07-02T21:04:42+5:302019-07-02T21:05:23+5:30

खामखेडा : विमानात बसुन विध्यार्थ्यांना गगनाची सैर करून आणलेल्या जिल्हा परिषदेच्या फांगदर (ता. देवळा) शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा थेट ‘मंगळ’ ग्रहावर भरणार आहे. शिक्षक खंडु मोरे यांनी नुकतीच त्यासाठीची शाळा, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली होती. त्याचे नुकतेच बोर्डिंग पास देखील आले आहेत.

Fangdar schools to pay on Mars | फांगदर शाळा भरणार मंगळावर

फांगदर शाळा भरणार मंगळावर

Next
ठळक मुद्देशाळा, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली होती

खामखेडा : विमानात बसुन विध्यार्थ्यांना गगनाची सैर करून आणलेल्या जिल्हा परिषदेच्या फांगदर (ता. देवळा) शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा थेट ‘मंगळ’ ग्रहावर भरणार आहे. शिक्षक खंडु मोरे यांनी नुकतीच त्यासाठीची शाळा, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी केली होती. त्याचे नुकतेच बोर्डिंग पास देखील आले आहेत.
हे वाचुन बुचकुळ्यात पडलात ना....... तर ‘नासा’ या जगविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर २०२०’ हे अंतरिक्षयान ‘लाला ग्रह’ म्हणून ओळखल्या जाणाºया मंगळावर झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसºया ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम राबवत आहेत.
त्याअंतर्गत फांगदरच्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या उपक्रमासाठी नोंदवले होते. त्याचे आॅनलाईन बोर्डिंग पास नुकतेच मिळाले असुन या बोर्डिंग पासचे वाटप शाळेत करण्यात आले.
नासाच्या पसाडेना, कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या (जेबीएल) मायक्र ोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिप वर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या (७५ नॅनोमिटर) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ह्या चिप रोव्हर वर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी, तसेच या उपक्र माच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यानी नावे मंगळावर पाठवण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याचे शिक्षक संजय गुंजाळ यांनी सांगितले.
रोव्हर २०२० हे यान‘अ‍ॅटलस ५४१ या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ आॅगस्ट २०२० मध्ये लॉँच केले जाणार आहे. जे २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.
चौकट...
या उपक्र माच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासा ही अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणारी संस्था, मंगळ ग्रह त्या ग्रहावरची नासाची चालू असलेली मोहीम आणि पाठवले जाणारे रोव्हर २०२० हे अवकाशयान यांची माहिती मिळेल.
- सुनिता धनगर, गटशिक्षण अधिकारी, देवळा.
 

Web Title: Fangdar schools to pay on Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा