‘फांगुळगव्हाण’ एकाही घरात गणेशस्थापणा न करणारे अनोखे गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:45 PM2018-09-15T15:45:18+5:302018-09-15T15:46:29+5:30
घोटी : प्रदूर्षंण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात असताना इगतपुरी तालुक्यातील एका गावाने ही परंपरा गेली शेकडो वर्षांपासून राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.विशेष म्हणजे या गावात गेली शेकडो वर्षांपासून एकाही घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात येत नाही.मात्र गावात असणा-या गणेश मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

इगतपुरी शहराच्या हाकेच्या अंतरावर असणारे सुमारे दोन हजार वस्तीचे फांगुळगव्हाण हे गाव.गावात प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय.या गावात असणारे गणेश मंदिर हे जागृत देवस्थान.नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती असल्याने पंचक्र ोशीतील अनेक गणेशभक्त गणेशोत्सवाबरोबर वर्षभर या ठिकाणी दर्शनाला येतात.यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या गावात यात्रेचे स्वरूप येते.
मात्र या गावात गेली शेकडो वर्षांपासून एकाही घरात घरगुती गणपती अथवा सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून गणेशाची स्थापना करण्यात येत नाही. घरगुती अथवा सार्वजनिक गणेशाची स्थापना केल्यास त्या घरात अिप्रय घटना घडते असा समज असल्याने या गावाने गेली शेकडो वर्षांपासून कोणत्याही घरात गणेशाची स्थापना केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान एकीकडे एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला जात असताना मात्र या छोट्याशा गावात चक्क कोणीही गणपतीची स्थापना करीत नसल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
रामचंद्र म्हसणे (ग्रामस्थ)
आमच्या गावात असणार्या जागृत गणेशामुळे गेली शेकडो वर्षांपासून गावातील एकाही घरात गणेश स्थापना होत नाही.मात्र हा गणेश जागृत आण नवसाला पावणारा असल्याने गणेशोत्सव काळात गणेशभक्त मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.