वृषभदेव महाराज यांच्या १०८ फुटी मुर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी वन खात्याचा अडथळा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:03 PM2018-02-28T15:03:07+5:302018-02-28T15:03:07+5:30

दक्षिणमुखी असलेल्या मांगीच्या डोंगराच्या पुर्वमुखी पाषाणात सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर भगवान वृषभदेव यांची १०८ फुटी दगडातील प्रतिमेचे काम पुर्ण होऊन दोन वर्षे पुर्ण झाले आहेत. ११ ते १७ फेबु्रवारी २०१६ मध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला

Far from disturbing forest department to reach the 108-foot mark of Taurashdev Maharaj | वृषभदेव महाराज यांच्या १०८ फुटी मुर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी वन खात्याचा अडथळा दूर

वृषभदेव महाराज यांच्या १०८ फुटी मुर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी वन खात्याचा अडथळा दूर

Next
ठळक मुद्दे मांगीतुंगी देवस्थानाला वन खात्याची जमीन हस्तांतरभाविकांची सोय : स्थानिक नागरिकांच्या विरोधाने विश्वस्त त्रस्त

नाशिक : बागलाण तालुक्यातील मांगी-तुंगी डोंगरावर असलेल्या दिगंबर जैन धर्मियांचे पहिले तिर्थंकर वृषभदेव महाराज यांच्या १०८ फुटी मुर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी वन खात्याचा अडथळा दूर झाला असून, केंद्र सरकारकडे भाविकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वन खात्याने डोंगरावर जाण्यासाठी अडीच एकर जागा विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केली आहे. आता जागा ताब्यात मिळाल्यामुळे रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन केले जात असताना स्थानिक ग्रामस्थांनी मात्र रोजगार बुडण्याच्या भितीने रस्त्याला विरोध करण्याची भुमीका घेतली आहे.
दक्षिणमुखी असलेल्या मांगीच्या डोंगराच्या पुर्वमुखी पाषाणात सुमारे साडेचार हजार फूट उंचीवर भगवान वृषभदेव यांची १०८ फुटी दगडातील प्रतिमेचे काम पुर्ण होऊन दोन वर्षे पुर्ण झाले आहेत. ११ ते १७ फेबु्रवारी २०१६ मध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. जगभरात प्रसिद्ध झालेल्या या मुर्तीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक भेट देत आहेत. मांगी-तुंगी डोंगरावर असलेल्या प्राचीन लेण्यांवर जाण्यासाठी १३०० पायºयांचा जुना अवघड व खडतर मार्ग असल्यामुळे भगवान वृषभदेव यांच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी विश्वस्त मंडळाने पठारावरून लिफ्टची सोय केली आहे. परंतु लिफ्टपर्यंत पोहोचण्यासाठी वन विभागाच्या ताब्यातील मार्गावरून मार्गक्रमण करू देण्यास वन खात्याने हरकत घेतल्यामुुळे देशभरातून येणाºया भाविकांची गेल्या दोन वर्षापासून गैरसोय होत होती. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येऊन अखेर केंद्र सरकारच्या वन खात्याने २.७० हेक्टर जागा विश्वस्त मंडळाच्या हाती सुपूर्द केली आहे. त्याबदल्यात विश्वस्तांनी वन खात्याला तितकीच खासगी जागा विकत घेवून हस्तांतरीत केली शिवाय वन खात्याकडे ३६ लाख रूपयांचा भरणाही केला. शासनाने मुर्तीपर्यंत जाण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी निधी देण्याची तयारी दर्शविल्यामुळे या मुर्तीचे मुख्य पुजक संजय पापडीवाल यांनी १४ ‘फोरव्हील’ वाहने सज्ज ठेवली आहेत. तथापि, आजवर स्थानिक ग्रामस्थांकडून भाविकांची ने-आण करण्यासाठी पालखीची व्यवस्था केली जात होती त्यातुन रोजगार मिळत होता. आता मात्र वन खात्याच्या जमीनीतून रस्ता तयार झाल्यास भाविक वाहनातून ये-जा करतील व रोजगार बुडेल अशी भिती स्थानिकांना वाटू लागल्याने त्यांनी रस्त्याच्या कामाला विरोध करण्यास सुरूवात केली आहे. या संदर्भात दोन दिवसांपुर्वीच संजय पापडीवाल यांच्यासमवेत काही भाविकांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून प्रशासनाने या कामी सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

Web Title: Far from disturbing forest department to reach the 108-foot mark of Taurashdev Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.