नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे दूरगामी परिणाम :शरद जावडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:04 PM2019-09-20T23:04:12+5:302019-09-21T00:41:04+5:30
नव्या युगातील बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे देशातील आणि राज्यातील शिक्षण क्षेत्रात दूरगामी प्रतिकूल परिणाम होतील. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक विचार धारेवरदेखील परिणाम होतील, असे मत अखिल भारतीय उपाध्यापक सभेचे निमंत्रक प्रा. डॉ. शरद जावडेकर यांनी व्यक्त केले.
नाशिक : नव्या युगातील बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे देशातील आणि राज्यातील शिक्षण क्षेत्रात दूरगामी प्रतिकूल परिणाम होतील. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक विचार धारेवरदेखील परिणाम होतील, असे मत अखिल भारतीय उपाध्यापक सभेचे निमंत्रक प्रा. डॉ. शरद जावडेकर यांनी व्यक्त केले.
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि अध्यापक सभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. भा.वि. जोशी शैक्षणिक प्रसारक मंडळ आणि अध्यापक सभा पुणे यांच्या संयुक्त नव्या युगाचे बदलते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ या विषयावरप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय माजी शिक्षण आमदार जयवंतराव ठाकरे, संस्थेचे सचिव प्रवीण सोनवणे, घाडगे साहेब, दादा पठारे, प्राचार्य अलका दुनबळे आदी मान्यवर उपस्थित होते. के. एन. केला महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य आश्विनी गणपतराव मुठा आणि सचिव प्रवीण जोशी यांनी स्वागत केले.
मंगेश जोशी, शीतल सावंत यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य संजय शिंदे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
डॉ. जावडेकर यांनी व्याख्यानात, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ च्या मसुद्याबाबत भूमिका, शिक्षणाचे खासगीकरण, नवे शैक्षणिक धोरण की नवे पिळवणूक धोरण आदी मुद्द्यांबाबत विचार मांडले, माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील उणिवा आदीबाबत आपले विचार मांडले.