लासलगाव कोविड केंद्रातून चिमुकल्यासह १० जणांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 08:41 PM2020-07-09T20:41:57+5:302020-07-10T00:26:53+5:30
लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले १० बाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन कोरोनावर मात केल्याने त्यांना गुरुवारी (दि. ९) टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. त्यात एका चार वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे

लासलगाव येथील एकाच कुटुंबातील खासगी डॉक्टरसह सहा तर विंचूर येथील तीन असे १० कोरोना बाधित रुग्ण लासलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची घरवापसी केली आहे. ही बाब दिलासा देणारी ठरली असल्याने डॉक्टर, परिचारिका, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी रुग्णांवर पुष्पवृष्टी करीत अभिनंदन केले.
नाशिकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंतराव पवार, लासलगाव येथील डॉ. राजाराम शेंद्रे , डॉ. बाळकृष्ण अहिरे, प्रमुख आरोग्य सेविका सविता जाधव, परिचारिका पाटेकर, दिलीप जेऊघाले, औषध विभागाचे विजयकुमार पाटील आदि उपस्थित होते.