शुभमंगल होण्यापूर्वीच झाली ताटातूट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:15 AM2018-03-27T00:15:57+5:302018-03-27T00:15:57+5:30
मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले वहाडी चक्क नवरीलाच रेल्वेगाडीत विसरले. सर्व वºहाडी नाशिकला उतरले. मात्र, रेल्वेच्या शौचालयात गेलेली नववधू गाडीतच राहिली. वºहाडी मंडळींनी मंडप गाठल्यानंतर, नववधूच सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि एकच शोधाशोध सुरू झाली.
इगतपुरी : मुलीच्या लग्नासाठी नागपूरहून नाशिककडे निघालेले वहाडी चक्क नवरीलाच रेल्वेगाडीत विसरले. सर्व वºहाडी नाशिकला उतरले. मात्र, रेल्वेच्या शौचालयात गेलेली नववधू गाडीतच राहिली. वºहाडी मंडळींनी मंडप गाठल्यानंतर, नववधूच सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि एकच शोधाशोध सुरू झाली. इगतपुरी स्थानकात उभ्या असलेल्या गाडीत एक मुलगी रडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी तिला सुखरूप लग्न मंडपात पोहोचविले. नागपूरच्या गोपाळ पेठमध्ये राहणाऱ्या मिरगे यांची मुलगी रजनी हिचा रविवारी दुपारी १ वाजता नाशिकरोड येथे विवाहसोहळा होता. सकाळच्या एक्स्प्रेसने वºहाडी नववधूला घेऊन नागपूरहून नाशिककडे निघाले. सकाळी साडेआठच्या सुमारास गाडी नाशिकरोड स्थानकात आली. त्यापूर्वीच नववधू शौचालयात गेली होती. स्टेशन येताच सामान उतरविण्याच्या नादात वºहाडी मंडळी नवरीला शौचाल यात सोडून निघाले. मंडपात पोहोचल्यानंतर नवरीच गायब असल्याने सर्वच घाबरले. शौचालयातून बाहेर आलेल्या रजनीला आपले नातेवाईक न दिसल्याने ती घाबरली व रडू लागली. यावेळी गाडीने इगतपुरी गाठले होते. पोलीस शिपाई गजानन जाधव, अनिता गवई, विकास साळुंखे यांचे तिच्याकडे लक्ष गेले. तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी मोबाइलवरुप संपर्क साधला. मुलगी सुखरूप असल्याचे समजताच, नातेवाइकांनी इगतपुरीकडे धाव घेतली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे लग्नाच्या अर्ध्या तासापूर्वी नववधू मंडपात पोहोचली आणि तिचा विवाह झाला.
नाशिकरोडच्या सुरक्षा बलाने या घटनेची दखल घेत त्वरित इगतपुरी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक सतीश विधाते यांना कळविले. विधाते यांनी रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या नागपूर एक्सप्रेस गाडीत तपासणी केली असता त्यांना रजनी रडताना मिळून आली. त्यांनी त्वरित नाशिकरोडच्या पोलिसांना कळविले.