पूर्व भागात जाणार पूरपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 05:54 PM2019-02-08T17:54:39+5:302019-02-08T17:54:51+5:30
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील देवनदीवर असलेल्या बंधाºयाची उंची दीड मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देवनदीचे पूरपाणी पूर्व भागात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील देवनदीवर असलेल्या बंधाºयाची उंची दीड मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देवनदीचे पूरपाणी पूर्व भागात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुंदेवाडी ते सायाळे हा ३४ किलोमीटरचा पूर कालवा होणार आहे.
या कामाचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. कुंदेवाडी बंधाºयाची उंची वाढल्याने पुरेशा क्षमतेने पाणी पूर्व भागात पोहचेल अशी अपेक्षा आहे. सुमारे ६८ कोटी ५० लाख रूपयांच्या खर्चातून सदर काम होणार आहे.
देवनदीवरील कुंदेवाडीतील बलक बंधाºयाची दीड मीटरने उंची वाढविल्यानंतर पुरेशा क्षमतेने पाइपलाइनद्वारे पाणी कालव्यातून सायाळेपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी पाच फूट व्यासाचे पाइप वापरण्यात येणार आहे. त्यानंतर चार व शेवटी तीन फूट व्यासाच्या बंदिस्त पाइपलाइनद्वारे कालव्याचे पाणी सायाळेपर्यंत नेण्याची योजना आहे. योजनेतील बंधाºयाची उंची वाढवण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, शिवसेना युवा नेते उदय सांगळे, स्टाईसचे संचालक नामकर्ण आवारे, पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, दीपक खुळे, स्टाईसचे अध्यक्ष पंडित लोंढे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष फकिरा हिरे, संजय सानप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.