गौरींबरोबरच गणरायाला भक्तिपूर्ण अंत:करणाने निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:19 AM2021-09-15T04:19:56+5:302021-09-15T04:19:56+5:30
दुसऱ्या दिवशी नैवेद्य भोजन आणि सायंकाळी हळदी कुंकवाचे कार्यक्रमदेखील पार पडले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी विसर्जन होते. त्यामुळे गेली ...
दुसऱ्या दिवशी नैवेद्य भोजन आणि सायंकाळी हळदी कुंकवाचे कार्यक्रमदेखील पार पडले.
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी विसर्जन होते. त्यामुळे गेली पाच दिवस घरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मंगळवारी सायंकाळी गौरींना पुनरागमनाचे आवाहन करून गौरींचे विसर्जन करण्यात आले तर गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या. नाशिक महापालिकेने यंदाही विसर्जन स्थळी मूर्तिदानाची व्यवस्था केली हेाती. त्यानुसार मूर्ती घेऊन येणाऱ्यांना आवाहन करण्यात आले आणि मूर्तींचे दान घेण्यात आले.
इन्फो...
शाडू मातीच्या मूर्ती विसर्जनाला विरोध
पीअेापीच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करू नये इथपर्यत ठीक परंतु नाशिक महापालिकेने शाडू मातीच्या मूर्ती सक्तीने जमा करण्यास सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडले. कायद्याचा भलता अर्थ लावून अकारण भावनिक विषय निर्माण करू नये, असे आवाहन गणेश भक्तांनी केले आहे.
---
गेल्या पाच दिवसांपासून घरोघर विराजमान असलेल्या गणरायाचे आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. या निमित्ताने गोदाकाठी गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्याच परंतु गौरींच्या मुखवट्यांना स्नान दाखवून त्या परत नेण्यात आल्या.