ग्रामसेवकाला निरोप अन् गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचे पाट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:44+5:302021-08-22T04:16:44+5:30

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ...

Farewell to the Gram Sevak, tears in the eyes of the villagers .... | ग्रामसेवकाला निरोप अन् गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचे पाट....

ग्रामसेवकाला निरोप अन् गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रूंचे पाट....

Next

वेळुंजे : शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला बदली काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनाचा ठाव घेत असतात. त्यातच गाव-खेड्यात ग्रामसेवक भाऊसाहेब, तलाठी तात्या म्हटलं की बदनाम माणूस. त्याच्याकडे सारेच संशयाचे पाहणार. परंतु तोरंगणच्या ग्रामसेवकाची बदली झाली तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव लोटलं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंनी दाटलेले आपलेपणाचे भाव होते. असे भाऊसाहेब प्रत्येक गाव-खेड्याला लाभले तर देशाचं किती भलं होईल नाही?

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील ग्रामसेवक सचिन पवार यांची नाशिक तालुक्यात बदली झाल्याने गावाच्यावतीने त्यांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता. निरोप समारंभात गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. मागील पाच वर्षांपासून पवार हे तोरंगणला बदली होऊन आले. सुरुवातीपासूनच सर्वांसोबत मिळते जुळते घेतले. ग्रामपंचायत म्हणजे आपसातील वाद, अंतर्गत कुरघोडी असतात. परंतु पवार यांनी कार्य उत्तम पेलत आपल्या कामाच्या आणि मवाळ स्वभावातून सर्वांना आपलेसे केले. लहानपणापासूनच अंगी धार्मिक वृत्ती त्यातूनच लहान-थोर मंडळीना ‘ माऊली’ या शब्दाने आवाज देऊन येथील प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करून तोरंगण (त्र्यंबक) चा विकास साधला. गावात वृक्ष लागवड, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेल्या या तोरंगणच्या नागरिकांनीही मोलाची साथ देत आणि त्यांच्या बरोबरीने उभे राहून गावचा विकास साध्य केला. आपल्या भाऊसाहेबाला निरोप देण्यासाठी जयवंत जाधव, सरपंच माया जाधव, नामदेव गायकवाड, शंकर जाधव, अरुण जाधव, राजाराम आंडे, राहुल जाधव, योगेश जाधव, लक्ष्मण जाधव, महेंद्र खोटरे, पोलीस पाटील निवृत्ती जाधव, चंदर कर्डेल, अमृता जाधव , मधुकर जाधव, परशराम जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, आश्रम शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

कोट...

मागील पाच वर्षांपासून पेसा तालुक्यात आदिवासी भागात काम करण्याची संधी मला मिळाली. माझं गाव तसं धार्मिक. कविवर्य कुसुमाग्रजांचा वारसा लाभलेले हे गाव. गावातील माणसं तितकीच प्रेमळ. या भावुक प्रसंगात गाव सोडताना या जीवभावाच्या माणसांपासून बाजूला जाणे तितकेच कठीण. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुम्हांला डोक्यावर घेणारच, हा धडा मी घेतला. या गावासोबतच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. गावाशी संवाद कधी तुटणार नाही, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन चालू राहील.

- सचिन पवार, ग्रामसेवक

210821\fb_img_1629529330169.jpg~210821\145-img-20210821-wa0000.jpg

ग्रामसेवक सचिन पवार यांना निरोप देताना ग्रामस्थ मंडळी~फोटो छोटा

Web Title: Farewell to the Gram Sevak, tears in the eyes of the villagers ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.