ध्यान, तप, जप यापेक्षा भक्ती श्रेष्ठ
By admin | Published: February 1, 2016 10:38 PM2016-02-01T22:38:32+5:302016-02-01T22:57:00+5:30
तुळशीदास महाराज : गुरुवर्य दामोदर महाराज यांच्या आश्रमात कीर्तन
त्र्यंबकेश्वर : ध्यान, तप, जप यापेक्षा भक्ती श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन नामदेव महाराजांचे वशंज ह.भ.प. तुळशीदास रामदास महाराज यांनी केले. अंजनेरी येथील ह.भ.प. गुरुवर्य दामोदर महाराज यांच्या आश्रमात निवृत्तिनाथ महाराज यांची महावारी आणि सिंहस्थ पर्वणी काळामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम व कीर्तन सोहळ्यात त्यांचे कीर्तन झाले.
यावेळी त्यांनी भक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले. ते म्हणाले ध्यान, तप, जप, व्रत-वैकल्य करूनही परमात्मा प्राप्त होत नाही. तर तो फक्त भोळ्या भाबड्या भक्तीचा भुकेला आहे. भक्ताच्या मनात ध्यानात सदैव अखंडित चिंतन हवे अशी भक्ती हवी, परमात्मा हा भक्तीचा भुकेला आहे. नामदेवांनीही भगवंताजवळ एकच मागणे मागितले. तुझी भक्ती माझ्या हृदयात असू दे. तुझ्या चरणी मला स्थान दे अशीच भक्ती भगवंतालाही अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या सप्ताहात कीर्तनसाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. (वार्ताहर)