दीड दिवसाच्या गणरायांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 01:02 AM2020-08-24T01:02:44+5:302020-08-24T01:03:07+5:30

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा जयघोष करून रविवारी पंचवटीतील रामकुंड येथे नाशिककर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. महानगरपालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेशमूर्तींचे संकलनही करण्यात आले.

Farewell to the Republicans of the day and a half | दीड दिवसाच्या गणरायांना निरोप

दीड दिवसाच्या गणरायांना निरोप

Next
ठळक मुद्देपारंपरिक पूजेनंतर विसर्जन : महानगरपालिकेकडून उपाययोजना

नाशिक : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा जयघोष करून रविवारी पंचवटीतील रामकुंड येथे नाशिककर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. महानगरपालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेशमूर्तींचे संकलनही करण्यात आले.
यावर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा होत असला तरी भाविकांचा उत्साह कणभरीही कमी झालेला नाही त्यामुळेच गणेशभक्तांनी दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पूजाविधी करून लाडक्या बाप्पांना निरोप दिला. गंगापूर धरणातून विसर्ग केला जात असल्याने मनपा व जिल्हा प्रशासनाच्या वतीने विर्सजनासाठी भाविकांनी नदीवर गर्दी करू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे गणेशभक्तांनी काळजी घेत बाप्पांचे विसर्जन
केले.
अनेकांनी शाडू मातीच्या बाप्पांची प्रतिषपणा केली होती. त्यांनी परंपरागत पूजा नैवद्य देवून बाप्पाचे घरीच विसर्जन केले. दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यापूर्वी गणेशभक्तांनी विधिवतपणे गणेशाचे पूजन करून महाआरती व मोदकाचा नैवेद्य चढवून गणरायाकडे सर्व काही मंगल राहू दे, करोना संकट टळू दे, अशी प्रार्थना करून बाप्पांचे नदीपात्रात विसर्जन करून निरोप दिला.
गणेशोत्सवात कोणी दहा दिवस, तर कोणी ७ दिवसांपर्यंत, कुणी दीड दिवसाच्या गणेशाची प्रतिष्ठापना करत असतात. रविवारी गणपती प्रतिष्ठापनेचा दीड दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्याने भाविकांनी गंगाघाटावर गोदावरी नदीपात्रात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

Web Title: Farewell to the Republicans of the day and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.