आठ महिन्यांच्या बाळासह एकवीस जणांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 09:09 PM2020-07-15T21:09:07+5:302020-07-16T00:14:01+5:30
लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या आठ महिन्यांच्या बाळासह एकवीस बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. या कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त होत ११० जणांनी घरवापसी केली आहे.

निफाड तालुक्यातील आठ गावातील एकवीस जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लासलगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. बुधवारी दुपारी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार यांच्या उपस्थितीत लासलगाव येथील १, धारणगाव ४, निफाड ३, ओझर ४, भुसे १, मरळगाई-१, शिवडी ३ तर पिंपळगाव बसवंत येथील ४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
यावेळी नाशिकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंतराव पवार, लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, लासलगाव येथील कोरोना कोविड उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे, लासलगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे, प्रमुख आरोग्य-सेविका सविता जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, दत्तू शिंदे, संतोष निरभवणे, घनश्याम माठा आदी उपस्थित होते.