शेतीच्या वादातून कातरवाडीत हाणामारी

By Admin | Published: February 10, 2016 10:19 PM2016-02-10T22:19:43+5:302016-02-10T22:43:40+5:30

शेतीच्या वादातून कातरवाडीत हाणामारी

Farm farming in Katwarwadi | शेतीच्या वादातून कातरवाडीत हाणामारी

शेतीच्या वादातून कातरवाडीत हाणामारी

googlenewsNext

चांदवड : तालुक्यातील कातरवाडी येथे काही जणांनी एका शेतात अनधिकृत प्रवेश करून जेसीबीच्या सहायाने आंब्याची झाडे उपटून टाकली व लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची फिर्याद कातरवाडीच्या महिला सरपंच यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
कातरवाडीच्या सरपंच गीता रावसाहेब झाल्टे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, कातरवाडी येथील हिरामण संसारे, मेसू संसारे, सुभाष संसारे, राहुल संसारे, गुलाब संसारे, मंगल संसारे, प्रवीण संसारे आदि २६ जणांनी कातरवाडी शिवारात गीता झाल्टे यांच्या घरासमोरील शेतामध्ये (गट नंबर १२५/१) प्रवेश करून सरपंच झाल्टे यांना ही शेतजमीन आमची आहे. तुमचा या जमिनीशी संबंध नाही. असे म्हणून जेसीबीच्या सहाय्याने शेतातील आंब्याचे झाड उपटून टाकून नुकसान केले व गीता झाल्टे व त्यांचे पती यांना शिवीगाळ केली व गीता झाल्टे यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.( वार्ताहर)

Web Title: Farm farming in Katwarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.