पिंपळगावी पायी जाणाऱ्या शेतमजुराला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 10:39 PM2021-08-18T22:39:17+5:302021-08-18T22:39:41+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर येथील देवी मंदिरा जवळ शेतावर मजुरी साठी जाणाऱ्या मजुराला वणी कडून पिंपळगावच्या दिशेने भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात ट्रकने चिरडल्याने मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच परिसरात काही तासात दुसरा अपघात झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शिर्डी सुरत महामार्गावर वणीच्या दिशेने पिंपळगावकडे येणाऱ्या अज्ञात ट्रकने शेतावर पायी जाणाऱ्या निफाड तालुक्यातील मुखेड येथील शेतमजूर गणेश बाळू सूर्यवंशी (३२) यास पाठीमागून जोरदार ठोस मारून चिरडले . त्यात त्यास गंभीर दुखापत झाली . तातडीने रुग्णवाहिका चालक प्रकाश पावले यांनी जखमी सूर्यवंशी यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अधिक तपास पिंपळगाव बसवंत येथील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे
शिर्डी-सुरत महामार्ग मृत्यूचा सापळा
महिनाभराचा अपघाताचा आकडा जर बघितला तर दहा पेक्षा जास्त गंभीर अपघात तर २० अपघात हे किरकोळ स्वरूपात झालेले आहे.त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे . महामार्गाचे काम अजून पर्यंत पूर्ण झालेले नसल्याने अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने महामार्गाच्या कामकाजावर वेळीच लक्ष देऊन ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक व पथदीप लावावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून व वाहनधारकांकडून होत आहे.