शेतकरी हा आपल्या जीवनाचा आधार प्रकाश होळकर: नांदगावला विद्यार्थी गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 02:59 PM2020-02-02T14:59:32+5:302020-02-02T15:00:30+5:30

  कार्यक्र माचे अध्यक्ष सर्जेराव पाटील होते. मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाविस्कर, डॉ. पगार, माणिक कवडे, सचिन साळवे,तुषार पांडे, ...

 Farmer is the backbone of his life: Prakash Holkar: Nandgaon Student Appreciation Ceremony | शेतकरी हा आपल्या जीवनाचा आधार प्रकाश होळकर: नांदगावला विद्यार्थी गुणगौरव सोहळा

नांदगाव महाविद्यालयात वार्षिक विद्यार्थी गुणगौरव बक्षीस वितरण समारंभात बोलतांनाकवी प्रकाश होळकर,व्यासपीठावर प्रभाकर काकळीज,तुषार पांडे, डॉ. पगार,प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल,सर्जेराव पाटील, सुरेश शेळके, संदिप जेजुरकर, प्राचार्य डॉ. बाविस्कर,मारु ती जगधने,संजय मोरे, माणकिराव कवडे,प्रा.आर.टी.देवरे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्दे नांदगाव: शेतकरी हा आपल्या जीवनाचा आधार आहे. तो सुखी तर आपण सुखी म्हणून शेतकº्यांकडे स्वाभिमानाने बघा,तरच त्यांच्या आत्महत्या थांबतील.असे कवी , गीतकार प्रकाश होळकर यांनी प्रतिपादन केले. ते येथील मविप्र समाज संस्थेचे कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्य

 

कार्यक्र माचे अध्यक्ष सर्जेराव पाटील होते. मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाविस्कर, डॉ. पगार, माणिक कवडे, सचिन साळवे,तुषार पांडे, सुरेश शेळके, संदीप जेजुरकर, मारु ती जगधने, संजय मोरे, आर.टी.देवरे,आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी कवी होळकर यांनी सांगितले अनुभव व निरीक्षण, यांच्या माध्यमातून कविता जन्म घेत असते. हे स्वत:च्या झूला या कवितेची निर्मिती मुलींच्या एक लिंबु झेलु बाई, दोन लिंबु झेलु या खेळाच्या निरीक्षणातुन झाल्याचे स्पष्ट केले. लोकगीते, लोककथा भारु ड, ग्रामीण जीवनातील अनुभव व कला जोपासा म्हणजे तुम्ही सकस कवीता लिहु शकाल असे ते म्हणाले. प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.संजय मराठे यांनी केले. प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा सादर केला. क्रि डा व सांस्कृतिक स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालनसुरेश नारायणे व उषा शिरोडे यांनी केले. सोलो डान्स रु पाली महाजन, धनगरी गीत कार्तिक औशिकर तर लावणी जागृती जाधव यांनी सादर केली. शेलापागोट्याचा कार्यक्र म पार पडला. संदिप दौड,निकम ,पी.डी.पवार,वाघ,आदिंनी वाचन केले.जावेद शेख यांनी आभार मानले.

 

 

Web Title:  Farmer is the backbone of his life: Prakash Holkar: Nandgaon Student Appreciation Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.