शेतकऱ्यास रोखपालाकडून मारहाण

By Admin | Published: January 5, 2017 01:38 AM2017-01-05T01:38:07+5:302017-01-05T01:38:21+5:30

मालेगाव : पत्रकार परिषदेत धक्कादायक प्रकार उघड

The farmer beat the cashier | शेतकऱ्यास रोखपालाकडून मारहाण

शेतकऱ्यास रोखपालाकडून मारहाण

googlenewsNext

मालेगाव : पत्नीच्या आजारपणासाठी व घर खर्चासाठी बॅँक शाखेतुन पैसे काढण्यास गेलेल्या शेतकऱ्याला बॅँक आॅफ महाराष्ट्राच्या करंजगव्हाण शाखेच्या रोखपालाने (कॅशीयर)ने बुटाने मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तालुक्यातील दहिदी येथील सोपान बाजीराव वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपबिती कथन केली. तब्बल तीन दिवस बॅँक शाखेत हेलपाटे मारुनही रक्कम मिळाली नाही त्यामुळे रोखपाल अभिजित बोरसे यांना तातडीने निलंबीत करावे अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
तालुक्यातील दहिदी येथील सोपान वाघ व त्यांची पत्नी निर्जला वाघ यांचे दोघांचे खाते करंजगव्हाण येथील बॅँक शाखेत आहे. सोपान वाघ यांनी त्यांच्या खात्यावरुन दोन हजार रुपये काढले होते. २ जानेवारी रोजी त्यांची पत्नी निर्मला वाघ यांच्या खात्यावरुन पैसे काढण्यासाठी वाघ ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत रांगेत उभे होते. त्यानंतर जेवणाची सुट्टी झाल्यामुळे बॅँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बॅँकेचे व्यवहार बंद ठेवले होते. अर्ध्या तासानंतर व्यवहार सुरळीत झाले. मात्र रोकड संपल्याने वाघ यांना टोकण देण्यात आले व दुसऱ्या दिवशी ३ जानेवारीला बॅँकेत या असे सांगण्यात आले. ३ जानेवारीला वाघ बॅँक शाखेत गेले असता त्यांच्या आधी ११ क्रमांकाचे टोकन दिलेल्या खातेदाराला रोखपालाने पैसे अदा केले मात्र वाघ यांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. वाघ यांनी रितसर रांगेत क्रमांक लावला. क्रमांक आल्यावर बॅँकेच्या रोखपालाने वाघ यांना तुमच्या पत्नीची सही घेऊन या असे सांगितले. वाघ हे पाच किलो मीटर घरी जाऊन आजारी असलेल्या पत्नीची सही घेतली. त्यानंतर बॅँकेत पोहचले असता रोखपालाकडे स्लीप दिली. त्यावेळी रोखपाल अभिजित बोरसे यांनी आता पत्नीला घेऊन या असे सांगितले. यावर वाघ यांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी त्यांच्या दालनातुन बाहेर निघुन वाघ यांना बुट हाणून मारला. तसेच इतर कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली. (प्रतिनिधी)

Web Title: The farmer beat the cashier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.