पावसाअभावी पेरण्या लांबणीवर राजापूर परिसरातील शेतकरी चितांतूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:06 PM2019-06-27T21:06:40+5:302019-06-27T21:06:53+5:30
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अजून वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर येथे पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्ग धास्तावले आहे. रोहिणी व मृग नक्षत्र हे कोरडेच गेले आहे. व आता आदा नक्षञ लागले असून कधी वरून राजा हजेरी लावेल या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.
राजापूर येथे मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावर्षी अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या पावसाअभावी खोळंबून पडल्या आहे. राजापूर सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्या करण्यासाठी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. यावर्षी बियाणे खते औषधे विक्रेत्यांकडे शांतता आहे.
त्यामुळे बळीराजासह व्यापारी शेतमजूर नोकरदार वर्ग यांच्या नजरा वरूणराजाच्या आगमनाकडे लागून आहेत. मात्र खरिप हंगामासाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने या पावसाच्या आगमनकडे बळीराजाच्या नजरा लागून आहेत. शुक्र वारी मृग नक्षत्र संपले आणि शनिवारी आदा नक्षत्रास सुरवात झाली आहे. परंतु आद्रा नक्षत्राचे काही दिवस हे कोरडे ठाक जाताना दिसत आहे.
आकाशात ढग दाटून येतात तोच वारा सुटून ढग कूठच्या कूठे वाहून जातात. त्यामुळे बळीराजाच्या आशेची निराशा होते. गेल्या वर्षी राजापूर परिसराती जून महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत.
या गावाला कितीही पाऊस झाला तरी दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिने हे या गावाला टॅँकरद्वारेच तहान भागवावी लागते. पण मागच्या वर्षी शेतकरी वर्गाने केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहत्ेत. काही वर्षापुर्वी एप्रिल आणि मे महिन्यात वळीव हमखास बरसायचा त्यामुळे मृगाच्या पावसावर पेरण्या उरकल्या जायच्या, मात्र निसर्गाच्या वातावरणातील बदलामुळे हे सारे चित्र पालटले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतीत आहे.