विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:20 AM2018-01-23T00:20:33+5:302018-01-23T00:21:03+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच खºया अर्थाने शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून, जोपर्यंत शेतकºयांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले जनआंदोलन चालूच ठेवणार असून, राज्यातील सर्व शेतकºयांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केले.
मेशी : केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच खºया अर्थाने शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून, जोपर्यंत शेतकºयांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले जनआंदोलन चालूच ठेवणार असून, राज्यातील सर्व शेतकºयांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. २२) देवळा तालुक्यातील मेशी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ होते. देशातील सर्व शेतकरी संघटना व २५ राज्यांतील शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय किसान मुक्ती संसदेची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकºयांना पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचा अधिकार व उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळवून देण्याचा अधिकार अशी दोन विधेयके आपण संसदेत मांडणार असून, ही दोन्ही विधेयके मंजूर करण्यासाठी वेळप्रसंगी संपूर्ण देशभर शेतकºयांना जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, सरला जाधव, मेशीच्या सरपंच ललिता शिरसाठ, माजी सरपंच बापू जाधव, विश्वास जाधव, प्रवीण शिरसाठ, दादाजी शिरसाठ, राजेंद्र ब्राह्मणकार, कुबेर जाधव, महादू मोरे, साहेबराव मोरे, कळवण तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, देवळा तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे, बागलाण तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, गोपीनाथ झाल्टे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी युवा नेते राजू शिरसाठ, प्रवीण पवार, समाधान गरुड, मोठाभाऊ मोरे, महेंद्र बोरसे, तुकाराम चव्हाण, तुषार शिरसाठ, पवन गरुड, पंकज बोरसे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक राजेंद्र शिरसाठ यांनी, तर सूत्रसंचालन भिला अहेर यांनी केले.
कांद्याचे भाव कायम राहावेत
शेतकºयांना सध्या कांद्याचे दोन पैसे जास्त मिळत असून, आगामी काळात कांद्याचे भाव असेच स्थिर राहण्यासाठी व कांद्याचे निर्यातमूल्य शून्य करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हाप्रमुख गोविंद पगार, पंढरपूर येथील युवा शेतकरी रणजित बागल यांनी मनोगत व्यक्त केले.