कर्जमाफीपासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:11 PM2017-08-18T23:11:25+5:302017-08-19T00:15:30+5:30
सरकारने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेच्या संकेतस्थळावर निफाड तालुक्यातील चांदोरी, दारणासांगवी, नारायणगाव, गोंडेगाव यासह तेरा गावे दिसत नसल्याने कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसूनदेखील अर्ज दाखल करता येत नसल्याने या गावांतील शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार असल्याने संताप व्यक्त होत आहे. सदर संकेतस्थळावर संंबंधित गावे त्वरित अपलोड करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
सायखेडा : सरकारने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेच्या संकेतस्थळावर निफाड तालुक्यातील चांदोरी, दारणासांगवी, नारायणगाव, गोंडेगाव यासह तेरा गावे दिसत नसल्याने कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसूनदेखील अर्ज दाखल करता येत नसल्याने या गावांतील शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार असल्याने संताप व्यक्त होत आहे. सदर संकेतस्थळावर संंबंधित गावे त्वरित अपलोड करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.
सन २०१६ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी दीड लाख रुपये प्रत्येकी कर्जमाफी सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना कर्जमाफीची मागणी आॅनलाइन पद्धतीने करावी व जे शेतकरी आॅनलाइन अर्ज दाखल करतील त्यांनाच कर्जमाफीची आवश्यकता आहे, असे गृहीत धरून त्यांनाच कर्जमाफी देण्यात येईल, असा फतवा काढला असल्याने सॉफ्टवेअरद्वारे विशिष्ट संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करावयाचा आहे. त्या प्रक्रि येत आपले गाव, आपण कर्ज घेतलेल्या सहकारी संस्था, बँकांची नावे अगोदर वेबसाइटवर समाविष्ट करण्यात आली आहे. वेबसाइट खुली केली असता निफाड तालुक्यातील चांदोरी, नारायणगाव, दारणासांगवी, गोंडेगाव, यासह तेरा गावांची नावे येत नसल्यामुळे कर्जमाफीचा अर्ज दाखल करता येत नाही. गावाचे नाव नसल्याने पुढील माहिती भरता येत नाही. गावातील थोडेफार शेतकरी कर्जमाफीत बसत असले तरी त्यांनाही लाभ मिळणार नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरून शासनाच्या विशिष्ट अपलोड करण्यासाठी निश्चित केलेल्या प्रक्रियेत या गावांची नावे का येत नाही याची चौकशी करून सदर नावे यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. मुदत संपण्याअगोदर प्रक्रिया पूर्ण करावी. या संदर्भात तहसील कार्यालयास कळविले असूनही कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.