दूध संघावर शेतकरी विकासचे वर्चस्व

By admin | Published: June 29, 2015 11:58 PM2015-06-29T23:58:05+5:302015-06-29T23:58:37+5:30

दूध संघावर शेतकरी विकासचे वर्चस्व

Farmer development domination of milk team | दूध संघावर शेतकरी विकासचे वर्चस्व

दूध संघावर शेतकरी विकासचे वर्चस्व

Next


नाशिक : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १२ जागांसाठी मतमोजणी होऊन त्यात माजी आमदार माणिकराव कोेकाटेंच्या शेतकरी विकास पॅनलला दहा जागा, तर पंढरीनाथ थोरे यांच्या प्रगती पॅनलला दोन जागा मिळाल्या. एकूण १५ जागांपैकी कोकाटेंच्या पॅनलला १२, तर पंढरीनाथ थोरे यांच्या पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
काल (दि.२९) सकाळपासूनच द्वारका येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच दोन्ही पॅनलमध्ये चुरस कायम होती. तालुकानिहाय उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे - चांदवड - विजय कोतवाल - १०२ व रघुनाथ अहेर - ७४, दिंडोरी - भाऊराव पाटील - ९९, नारायणराव सोनवणे -७५,दोन मते बाद, निफाड - सुरेश भोज - १, शिवाजी ढेपले - ७९ व पंढरीनाथ थोरे - ८८, सीताराम वडघुले - ७, नांदगाव - कारभारी भिलोरे - ३, पुरुषोत्तम पाटील - ६८, दिलीप शेवाळे - १०४, नाशिक - नामदेव ढिकले - १०४, मधुकर पेखळे - ७१, बागलाण - स्वप्नील अहिरे - ८२, नथू सूर्यवंशी - ९३, सिन्नर - किसन आव्हाड - ८४, हौशीराम घोटेकर - ९१, शिवाजी गाडे - ८१, सुभाष निकम - ९४, महिला राखीव दोन जागा - छाया काळे - ११२, कल्पना कुऱ्हे - ८४, भारती नागरे - ००, सुनीता राजोळे - ५८, गीता झाल्टे - ७९, इतर मागासवर्गीय - सुरेश भोज - १, साहेबराव ढोमसे - ६८, शरद लहरे - १०६, भटक्या जाती विमुक्त जमाती - दिलीप कातकाडे - ९२, जानकीनाथ खांडेकर - ८४ आदिंना मते मिळाली. यात विजय कोतवाल - १०२, भाऊराव पाटील - ९९, पंढरीनाथ थोरे - ८८, दिलीप शेवाळे-१०४,नामदेव ढिकले-१०४,नथू सूर्यवंशी-९३, सुभाष निकम-९४, छाया काळे-११२, कल्पना कुऱ्हे-८४, शरद लहरे-१०६, दिलीप कातकाडे-९२ हे सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती / जमाती संवर्गातून यापूर्वीच पंढरीनाथ थोरे गटाचे शिवाजी बोराडे, तर विनोेद चव्हाण व योगेश पगार हे माणिकराव कोकाटे गटाचे संचालक अविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयप्रकाश पगार यांनी, तर त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय बोरसे यांनी काम पाहिले. यावेळी माजी आमदार माणिकराव कोकाटे, सुनील आडके. जि.प. गटनेते प्रवीण जाधव, उपसभापती अनिल ढिकले, संभाजी पवार आदिंसह विजयी उमेदवारांनी तसेच माणिकराव कोकाटे समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला.(प्रतिनिधी)

Web Title: Farmer development domination of milk team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.