आंबेगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल
By admin | Published: February 25, 2016 10:40 PM2016-02-25T22:40:28+5:302016-02-25T23:20:19+5:30
आंबेगाव सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल
येवला : तालुक्यातील आंबेगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळविला, तर श्री विजय पॅनलला दोन जागा मिळाल्या.
माजी सरपंच आनंदा गिते व माजी सदस्य अशोक गिते, सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने ११ जागांवर विजय मिळविला. माजी सदस्य मनोज गिते व माणकिराव गिते यांच्या नेतृत्वाखाली श्री विजय पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
सर्वसाधारण गटातून विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- कारभारी आव्हाड (११३), लक्ष्मण आव्हाड (११२), संजय आव्हाड (११०), आनंदा गिते (१३६), सुरेश काळे (१२१), सोमनाथ सांगळे (१३२), पुंडलिक सोनवणे (१२०) हे सर्व उमेदवार शेतकरी पॅनल. राजेंद्र दराडे (११३) श्री विजय पॅनल.शेतकरी विकासचे मधुकर धात्रक व संजय आव्हाड यांना समान ११० मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यात संजय आव्हाड विजयी झाले. इतर उमेदवारांना मिळालेली मते, गोविंद आव्हाड (१०७), मधुकर आव्हाड (८८), संजय आवटे (१०२), निवृत्ती काळे (१००), संपत ओझरकर (१००), रतन सोनवणे (१०८), नाना सुराडे (१०९),भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातून शेतकरी विकास पॅनलचे पुंडलिक गिते (१२०) यांनी श्री विजयचे माणकिराव गिते (१०८) यांचा पराभव केला. महिला राखिव गटातून श्री विजय पॅनलच्या सुमनबाई गिते (१२३) व शेतकरी विकासच्या लहानूबाई आव्हाड (१२०) यांनी कविता काळे (११४) व शांताबाई आव्हाड (१००) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती गटातून शेतकरी विकासचे रामचंद्र भालेराव (१३०) यांनी श्री विजय पॅनलचे उत्तम भालेराव (१०२) यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गातून शेतकरी विकासचे दत्तू सुराडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शेतकरी विकासचे नेते आनंदा गिते, अशोक गिते, विलास गिते, नारायण गिते, अनिल गिते, घनश्याम काळे, नितीन काळे, एकनाथ आव्हाड, पंडीत आव्हाड, संपत राजोळे, नंदु सुराडे, शिवाजी सोनवणे तर श्री विजय पॅनलचे नेते निवृत्ती सोनवणे, शांताराम गिते, मनोज गिते, माणकि गिते, शिवाजी आव्हाड, रतन सोनवणे, राजू काळे आदिंसह मतदार उपस्थित होते.