ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 06:33 PM2020-07-30T18:33:00+5:302020-07-30T18:33:33+5:30

सुरगाणा : भात लागवडीसाठी चिखल तयार करून घराकडे परतत असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटून पलटी झाल्याने त्याखाली दबून युवा शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील काठीपाडा येथे घडली. संजय मोतीराम दोडके (२९) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.

Farmer dies after being crushed under a tractor | ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू

ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देबांधावरु न उतरत असताना ट्रॅक्टर जागीच भाताच्या आवणात पलटी झाला.

सुरगाणा : भात लागवडीसाठी चिखल तयार करून घराकडे परतत असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटून पलटी झाल्याने त्याखाली दबून युवा शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील काठीपाडा येथे घडली. संजय मोतीराम दोडके (२९) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. काठीपाडा शिवारातील शेतात नुकताच नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरने भात लावणी करीता चिखल तयार करून संजय घरी परत निघाला होता. गुडघाभर चिखलातून ट्रॅक्टर बाहेर काढून बांधावरु न उतरत असताना ट्रॅक्टर जागीच भाताच्या आवणात पलटी झाला. यावेळी संजय हा ट्रॅक्टरखाली दाबल्या गेला. मदतीसाठी त्याने आवाज दिला. परिसरातील शेतकरींना घटना समजताच त्यांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले. यादरम्यान संजयचा दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोर ही घटना बुधवारी दुपारनंतर साडेचार वाजेच्या सुमारास घडली. त्याच्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. संजयच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई, वडील असा परिवार आहे. पोलीस पाटील सिताराम चौधरी यांनी पोलीसांना खबर दिली. पोलीसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे व पोलीस हवालदार चंद्रकांत दवंगे करीत
आहेत. 

Web Title: Farmer dies after being crushed under a tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.