विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:48 IST2020-10-02T22:23:44+5:302020-10-03T00:48:29+5:30
पेठ -तालुक्यातील बाडगी येथे विजेचा शॉक लागून तरूण शेतकºयाचा मृत्यू झाला.

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
ठळक मुद्दे शेतात काम करीत असतांना विजेचा शॉक लागल्याने जागेवरच मृत्युमुखी
पेठ -तालुक्यातील बाडगी येथे विजेचा शॉक लागून तरूण शेतकºयाचा मृत्यू झाला.
बाडगी येथील शेतकरी कमलेश रामदास भोये (वय ४२ ) हे आपल्या शेतात काम करीत असतांना विजेचा शॉक लागल्याने जागेवरच मृत्युमुखी पडले.
मनोहर यशवंत भोये यांनी दिलेल्या खबरीवरून पेठ पोलीसात घटनेची अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करु न मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रामदास भोये यांचा कमलेश हा मुलगा होत. त्याचे पश्चात पत्नी मुले , आई, वडील, भाऊ असा परिवार आहे .